mahadev aarti

महादेवाची आरती

महादेवाची आरती (mahadev aarti) ऑडिओ आणि विडिओ तसेच  कठीण शब्दांच्या अर्थासहितलवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा ।
वीषें कंठ काळा त्रिनेत्रीं ज्वाळा ॥
लावण्यसुंदर मस्तकीं बाळा ।
तेथुनियां जल निर्मळ वाहे झुळझूळां ॥ १ ॥

जय देव जय देव जय श्रीशंकरा ।
आरती ओवाळूं तुज कर्पूरगौरा ॥ ध्रु० ॥

कर्पूरगौरा भोळा नयनीं विशाळा ।
अर्धांगीं पार्वती सुमनांच्या माळा ॥
विभुतीचें उधळण शितिकंठ नीळा ।
ऐसा शंकर शोभे उमावेल्हाळा ॥ जय देव० ॥ २ ॥

देवीं दैत्य सागरमंथन पै केलें ।
त्यामाजीं जें अवचित हळाहळ उठिलें ॥
तें त्वां असुरपणें प्राशन केलें ।
नीळकंठ नाम प्रसिद्ध झालें ॥ जय देव० ॥ ३ ॥

व्याघ्रांबर फणिवरधर सुंदर मदनारी ।
पंचानन मनमोहन मुनिजनसुखकारी ॥
शतकोटीचें बीज वाचे उच्चारी ।
रघुकुळटिळक रामदासा अंतरीं ॥ जय देव जय देव० ॥ ४ ॥

महादेवाची आरती समाप्त –

हे पण वाचा: महाशिवरात्री 


‘लवथवती विक्राळा …….’ ही शिवाची आरती समर्थ रामदास स्वामी विरचित आहे. कोणत्याही देवतेची आरती म्हणतांना ती अर्थ समजून घेऊन म्हटल्यास भाववृद्धी लवकर होण्यास साहाय्य होते. यासाठी आता आपण शिवाच्या आरतीतील कठीण शब्दांचा अर्थ पाहूया.

अ. ‘लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा ।’ याचा अर्थ असा आहे, ‘समुद्रमंथनातून निघालेल्या भयंकर अशा हलाहल विषाच्या भयाने अतीप्रंचड अशी अनंत ब्रह्मांडांची संपूर्ण माळ कंप पावू लागली.’

आ. ‘लावण्यसुंदर मस्तकी बाळा ।’ यामध्ये ‘बाळा’ म्हणजे गंगा नदी.

इ. ‘विभूतीचे उधळण शितिकंठ निळा ।’ यातील ‘शितिकंठ’ म्हणजे मोराच्या कंठासारखा निळा कंठ असलेला.

ई. ‘शतकोटीचे बीज वाचे उच्चारी’ याचा अर्थ शंभर कोटी जपसंख्येएवढे फळ देणार्‍या श्रीरामनामरूपी. बीजमंत्राचा जप शिव अखंड करत असतो.

उ. ‘अशा पद्धतीने आपणासही भावपूर्ण आरती म्हणता येवो अन् भावजागृतीचा आनंद मिळो’, अशी शिवाच्या चरणी प्रार्थना.


शेतमालाची मोफत जाहिरात करण्या साठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या

ref: wikipedia, sanatan

mahadev aarti – mahadev aarti marathi – mahadev aarti lyrics – mahadev aarti mp3 free

Leave a Comment

Your email address will not be published.