श्री सद्गुरूंची आरती

सद्गुरूंची आरती

श्री द्गुरुंची आरती १

सगुण हे आरती निर्गुण ओंवाळूं । ल्पनेचें घृत घालूं दीप पाजळूं ।। १ ।।

ओंवाळूं आरती सद्गुरुनाथा श्रीगुरुनाथा भावें चरणकमळावरी ठेविला माथा ।। धृ ।।

अविद्येचा मोह पडला उपडोनी सांडूं । आशा मनशा तृष्णा काम क्रोध कुरवंडू ।। आरती ।। २ ।।

सद्गुरूचे पूजन केले षोडशोपचारे । रामानंद जीवन्मुक्त झाला संसारी ।। आरती ॥३॥


श्री सद्गुरूंची आरती २

फळलें भाग्य माझें धन्य झालों संसारी । सद्गुरु भेटला हो तेणें धरियेलें करीं ।।

पश्चिमे चालवीलें आत्मस्तुती निर्धारीं । त्रिकुटावरी नांद देखियेला पंढरी ॥ १ ॥

तें सुख काय सांगूं वाचे बोलता न ये । आरतिचेनि गुणे गेलें मीपण माये ।। धृ ।।

राउळामार्जी जातां राहे देह अवस्था मन हैं उन्मन झालें नसे बद्धतेची वार्ता ।।

हेतु हा मावळला शब्दा आली निःशब्दता । तटस्थ होऊनि ठेलों नीजरूप पहातां ॥ २॥

त्रिगुण गुण बाई पूर्ण जळत्या वाती । नवलाव अविनाश न समायें समंज्योती ।।

पाहतां लक्ष तेथें हालूं विसरली पातीं। नातुडे माझें नाही दिवसराती ।। ३ ।।

आरती सद्गुरुचि उजळली अंतरीं । प्रकाश थोर झाला सांठवेना अंबरी ।।

रविशशि मावळले तया तेजामाझारीं । वाजती दिव्य वाचें अनुहाते गजरी ।। ४ ।।

आनंदसागरांत प्रेमें दीधली बुडी । लाधलें सौख्य मोठें न ये बोलीं ।।

सद्गुरुचेनि संगे ऐसी आरती केली । निवृत्तीनें आनंदाची तेथे वृत्ति निमाली ॥ ५॥


श्री सद्गुरूंची आरती ३

धन्य धन्य हे प्रदक्षिणा सद्गुरुरायाची । झाली त्वरा सुरवरां विमान उतरायाची ।। धृ ।।

पदोपदर्दी अपार झाल्या पुण्याच्या राशी । सर्वही तीर्थे घडलीं आम्हा आदिकरुनि काशी ॥ १ ॥

मृदंग टाळ घोळ भक्त भावार्थे गाती । नामसंकीर्तनें ब्रह्मानंदें नाचती ।। २ ।।

कोटि ब्रह्महत्या हरती करितां दंडवत । लोटांगण घालितां मोक्ष लोळे पायांत ।। ३।।

गुरुभजनाचा महिमा न कळे आगमा-निगमांसी । अनुभव ते जाणती जे गुरुपदिंचे रहिवासी ।। ४ ।।

प्रदक्षिणा करूनि देह भावें वाहिला । श्रीरंगात्मज विठ्ठल पुढे उभा राहिला || ५||


श्री सद्गुरूंची आरती समाप्त .

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *