संत नामदेव

संत नामदेव आरती

संत नामदेव आरती विडिओ सहित 

जन्मता पांडुरंगे | जिव्हेवरी लिहिले | शतकोटी अभंग | प्रमाण कवित्व रचिले || १ ||

जय जयाजी भक्तरायां | जिवलग नामया | आरती ओवाळिता | चित्त पालटे काया || धृ.||

घ्यावया भक्तिसुख | पांडुरंगे अवतार |धरुनियां तीर्थमिषें | केला जगाचा उद्धार || जय.|| २ ||

प्रत्यक्ष प्रचीती हे | वाळवंट परिस केला | हारपली विषमता | द्दैतबुद्धी निरसली || जय.|| ३ ||

समाधि माहाद्वारी श्रीविठ्ठलचरणी | आरती ओवाळितो | परिसा कर जोडू || जय जयाजी||४ || 

2 thoughts on “संत नामदेव आरती”

  1. कोळेकर सुनिल

    खरोखरच खूपच सुंदर व छान संत साहित्य एका ठिकाणी वाचायला मिळते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *