ringan - रिंगण

ringan – रिंगण

ringan information marathi

पालखी सोहळ्यातले एक महत्वाचे आकर्षण. हा कार्यक्रम पालखीत सहभागी वारकऱ्यांबरोबरच स्थानिक लोकांचा व माध्यमांच्या आकर्षणाचा विषय असतो . हा एक प्रकारचा खेळ म्हणता येईल. याचा शब्दशः अर्थ म्हणजे वर्तुळ . रिंगण म्हणजे म्हणजे पालखी भोवती गोल फिरणे.


हे पण वाचा :- दिंडीची संपूर्ण माहिती


रिंगणचे ठिकाण म्हणजे मोठे मैदान. प्रत्येक पालखी सोहळ्याची रिंगणाची ठिकाणे ठरलेली आहेत. रिंगणासाठी पालखी सोहळ्यातील भाविकांच्या संख्येनुसार मोकळी जागा लागते. काही सोहळ्यांमध्ये सहभागी वारकऱ्यांच्या वाढत्या संख्येनुसार रिंगणाची जागा बदलण्यात आली आहे. पालखी सोहळा वाटचाल करत रिंगणाच्या ठिकाणी पोचतो तेव्हा आधी चोपदार रिंगण लावतात . यामध्ये मध्यभागी पालखी, पालखीच्या सभोवती पताकाधारी वारकरी व दिंड्या , त्याभोवती रिंगणासाठी मोकळी जागा व पुन्हा त्याभोवती दिंड्या व रिंगण बघायला आलेले भाविक उभे रहातात . रिंगण लावणे हे कौशल्याचे काम आहे . चोपदारांचे कौशल्य व वारकऱ्यांची शिस्त याठिकाणी दिसून येते .

रिंगणामध्ये मोकळ्या ठेवलेल्या मार्गावर – तुळशी वृंदावन घेतलेल्या महिला, हातात पताका म्हणजे झेंडा घेतलेले वारकरी व विणेकरी हे स्वतंत्र रित्या पळतात.रिंगणाचे मुख्य आकर्षण असते अश्वांची दौड. पालखी सोहळ्यात एक अथवा दोन अश्व सहभागी असतात. यात एका अश्वावर जरी पटका घेतलेला स्वार असतो तर एक अश्व रिकामा असतो. रिकाम्या अश्वावर संत बसतात अशी भाविकांची श्रद्धा असते. चोपदार अश्वाला रिंगणाचा मार्ग फिरून दाखवतात. त्यांत अश्व मोकळा सोडतात. अश्व रिंगणाला तीन फेऱ्या मारतात. यावेळेस भाविक माउली माउली असा गाजर करतात. अश्वाची दौड हा रिंगणाचा कळस असतो.उभे रिंगण गोल रिंगणा प्रमाणे उभे रिंगण हाही एक रिंगणाचा प्रकार आहे. यात दिंड्या वर्तुळाकार उभ्या न रहाता, पालखीच्या दोन्ही बाजूने समोरासमोर उभ्या राहतात. या मधून अश्व दौडतो.

उडीचा खेळ आणि  रिंगण झाल्यावर दिंड्यांचे विविध खेळ होतात. हे खेळ होताना टाळ व भजन सुरू असते. हे खेळ खेळणे आणि बघणे हा एक अवर्णनीय अनुभव आहे. यामध्ये मध्यभागी पालखी ठेवून कडेने पाकळ्यांप्रमाणे रचना करून टाळकरी बसतात. वेगवेगळ्या ठेक्यांवर ज्ञानोबा तुकाराम हे भजन करतात. या वर्तुळाच्या कडेने पखवाज वादक उभे राहून पखवाज वाजवतात. पाऊस पडून चिखल झाला असला तरीही पावसात, चिखलात बसून हा खेळ खेळून वारकरी याचा आनंद लुटतात.

बकरी रिंगण(ringan) संत तुकाराम महाराज व संत सोपानकाका पालखी सोहळ्यात मेंढरांचे अथवा बकरी रिंगण सुद्धा होते . पालखी सोहळ्याच्या मार्गावर असलेले शेतकरी भाविक आपली मेंढरे घेऊन येतात. ही मेंढरे रथाच्या भोवती प्रदक्षिणा घालतात. पालखी सोहळ्यात अशा प्रकारे विविध समाजातील लोक परीने सहभागी होतात .

पालखी सोहळ्यावर व त्यातही विशेष करून रिंगणावर(ringan) ( घोड्याची दौड , चोपदारांचा सहभाग, कर्णा वाजवून पालखी निघण्याच्या वेळा सूचित करणे ) मराठेशाही लष्करी छाप जाणवते. तुकोबांच्या वंशजांनी तुकोबांच्या पश्चात पालखी सोहळा सुरु केला तेव्हा देहू वरुन पालखी आळंदीला जाऊन तिथून पंढरपूरजाई. हा संयुक्त सोहळा होता.पुढे काही वादामुळे हैबतबाबांनी आळंदीची वेगळी पालखी केली. हे हैबतबाबा शिंदे सरदारांच्या सैन्यात होते. या सोहळ्याला शितोळे व ग्वाल्हेर च्या शिंदेंनी मदत केली. यांच्याच काळात सैन्याशी साम्य दाखवणाऱ्या रिंगण सारख्या पद्धती पालखी सोहळ्यात सुरू झाल्या.

रिंगण माहिती मराठी समाप्त


तुमच्या शेतमालाची मोफत जाहिरात करण्या साठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या 

ringan information marathi

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *