आदिनाथें उपदेश पार्वतीस केला - संत बहिणाबाई पाठक अभंग

बहुत अंतरीं शोक आरंभिला – संत बहिणाबाई अभंग

बहुत अंतरीं शोक आरंभिला- संत बहिणाबाई अभंग


बहुत अंतरीं शो आरंभिला ।
कां मज विठ्ठला मोकलिलें ॥ १ ॥
त्रिविध तपानें तापलें मी बहु ।
जाईना कां जीऊ प्राण माझा ॥ २ ॥
तंव अकस्मात सातविया दिनीं ।
नामसंकीर्तनीं घोषयुक्त ॥ ३ ॥
तुकाराम रूपें येवोनी प्रत्यक्ष ।
म्हणे पूर्वपक्ष सांभाळींजे ॥ ४ ॥
नको करूं चिंता असें मी तुजपाशीं ।
घेईं अमृताशी हातींचीया ॥ ५॥
गाय केलें वत्स मुखीं निघे धार ।
अमृत हें सार सेवीं हेंची ॥ ६ ॥
ठेवोनियां कर मस्तकीं बोलिला ।
मंत्र सांगितला कर्णरंध्रीं ॥ ७ ॥
म्यांही पायांवरी ठेविलें मस्तक ।
दिधलें पुस्तक मंत्र गीता ॥ ८ ॥
कार्तिकांत वद्य पंचमी रविवार ।
स्वप्नींचा विचार गुरुकृपा ॥ ९ ॥
आनंदले मन चिद्रूपीं कोंदलें ।
उठोनि बैसलें चमत्कारें ॥ १० ॥
मंत्र आठविती तुकोबास्वरूपा ।
स्वप्नामाजीं कृपा पूर्ण केली ॥ ११ ॥
अमृत पाजिलें चवीं अनारिसीं ।
साक्ष ज्याची त्यासी मनामाजीं ॥ १२ ॥
बहिणी म्हणे ऐसी कृपा सद्‌गुरूची ।
तुकारामें साची पूर्ण केली ॥ १३ ॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

बहुत अंतरीं शोक आरंभिला – संत बहिणाबाई अभंग

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *