आदिनाथें उपदेश पार्वतीस केला - संत बहिणाबाई पाठक अभंग

न बोलवे शब्द अंतरींचा धावा – संत बहिणाबाई अभंग

न बोलवे शब्द अंतरींचा धावा – संत बहिणाबाई अभंग


न बोलवे शब्द अंतरींचा धावा ।
नायके तुकोबा काय कीजे ॥ १ ॥
अदृष्ट करंटें साह्य न हो देव ।
अंतरींची हांव काय करूं ॥ २ ॥
तेरा दिवस ज्यानें वह्या उदकांत ।
घालोनियां सत्य वाचविल्या ॥ ३ ॥
महाराष्ट्री शब्दांत वेदान्ताचा अर्थ ।
बोलिला लोकांत सर्वद्रष्टा ॥ ४ ॥
अंतर साक्ष आहे निरोपणीं हेत ।
जडे परी चित्त वोळखेना ॥ ५ ॥
बहिणी म्हणे मीच असेन अपराधी ।
अध्याय त्रिशुद्धी काय त्यांचा ॥ ६ ॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

न बोलवे शब्द अंतरींचा धावा – संत बहिणाबाई अभंग

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *