आदिनाथें उपदेश पार्वतीस केला - संत बहिणाबाई पाठक अभंग

संचितासी दग्ध करी ऐसा कोण – संत बहिणाबाई अभंग

संचितासी दग्ध करी ऐसा कोण – संत बहिणाबाई अभंग


संचितासी दग्ध री ऐसा कोण ।
सद्‌गुरुवांचोन जाण मना ॥ १ ॥
यालागीं सद्‌गुरु असावा उत्तम ।
जेणें निमे श्रम संसाराचा ॥ २ ॥
त्रिविध तापासी कोण करी शांत ।
सद्‌गुरु एकान्त न जोडतां ॥ ३ ॥
जन्ममरणाची कथा कैं निवारे ।
सद्‌गुरु निर्धारें न भेटतां ॥ ४ ॥
वासना निःशेष निवारेल तेव्हां ।
भेटेल तुकोबा सद्‍गुरु तो ॥ ५ ॥
बहिणी म्हणे माझा जाऊं पाहे जीव ।
का हो न ये कींव तुकोबा ॥ ६ ॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

संचितासी दग्ध करी ऐसा कोण – संत बहिणाबाई अभंग

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *