मच्छ जैसा जळावांचोनी तडफडी – संत बहिणाबाई अभंग
मच्छ जैसा जळावांचोनी तडफडी ।
तैसीच आवडी तुकोबाची ॥ १ ॥
अंतरींचा साक्षी असेल जो प्राणी ।
अनुभवें मनीं जाणेल तो ॥ २ ॥
तृषितांसी जैसें आवडे जीवन ।
तैसा पिंड प्राणावीण तया ॥ ३ ॥
बहिणी म्हणे हेत तुकोबांचे पायीं ।
ऐकोनिया देहीं पदें त्यांचीं ॥ ४ ॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.