संत चोखामेळा अभंग

वेध कैसा लागला – संत चोखामेळा अभंग – २२६

वेध कैसा लागला – संत चोखामेळा अभंग – २२६


वेध कैसा लागला वो जीवा ।
नाठवेचि हेवा दुजा कांहीं ॥१॥
पंढरीचे वाटे येती वारकरी ।
सुखाची मी करीं मात तयां ॥२॥
माझ्या विठोबाचे गाती जे नाम ।
ते माझे सुखधाम वारकरी ॥३॥
लोटांगणें सामोरा जाईन तयांसी ।
क्षेम आनंदेसी देईन त्यांसी ॥४॥
चोखा म्हणे माझा प्राणाचा तो प्राण ।
जाईन वोवाळीन जीवें भावें ॥५॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

वेध कैसा लागला – संत चोखामेळा अभंग – २२६

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *