संत चोखामेळा अभंग

निगमाचे शाखे आगमाचें – संत चोखामेळा अभंग – २७६

निगमाचे शाखे आगमाचें – संत चोखामेळा अभंग – २७६

निगमाचे शाखे आगमाचें फळ ।
वेद शास्‍त्रा बोल विठ्‌ठल हा ॥१॥
पुराणासी वाड योगियांचें गुज ।
सकळां निजबीज विठ्‌ठल हा ॥२॥
निगम कल्पतरु भक्तांचा मांदुस ।
तोहा स्वयंप्रकाश विठ्‌ठल हा ॥३॥
चोखा म्हणे तो तूं जगाचे जीवन ।
संताचें मनरंजन विठ्‌ठल हा ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

निगमाचे शाखे आगमाचें – संत चोखामेळा अभंग – २७६

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *