संत चोखामेळा अभंग

आपुल्या आपण सांभाळोनी – संत चोखामेळा अभंग – ३०१

आपुल्या आपण सांभाळोनी – संत चोखामेळा अभंग – ३०१

आपुल्या आपण सांभाळोनी घ्यावें ।
आहे नाहीं ठावें तुम्हां सर्व ॥१॥
वांयाचि करणें लौकिकाचा गोवा ।
कोठवरी देवा बोलणें हें ॥२॥
अंगा नाहीं आलें तंव तें साहालें ।
खादलें पचलें तरी तें हित ॥३॥
चोखा म्हणे तुमचें तुम्हासी सांगणें ।
माझें यांत उणें काय होतें ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

आपुल्या आपण सांभाळोनी – संत चोखामेळा अभंग – ३०१

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *