संत चोखामेळा अभंग

कोण माझा आतां – संत चोखामेळा अभंग – ३१२

कोण माझा आतां – संत चोखामेळा अभंग – ३१२


कोण माझा आतां करील परिहार ।
तुज वीण डोंगर उतरी कोण ॥१॥
तूं वो माझी माय तूं वो माझी माय ।
दाखवीं गे पाय झडकरी ॥२॥
बहुत कनवळा तुझिया गा पोटीं ।
आतां नको तुटी करुं सेवा ॥३॥
चोखा म्हणे मज घ्यावें पदरांत ।
ठेवा माझें चित्त तुमचे पायीं ॥४॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

कोण माझा आतां – संत चोखामेळा अभंग – ३१२

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *