Skip to content
भवाचिया भेणें येतों – संत चोखामेळा अभंग – ३१८
भवाचिया भेणें येतों काकूळती ।
धांवे करुणामूर्ति देवराया ॥१॥
पडीलोसे माया मोहाचीये जाळीं ।
येवोनी सांभाळीं देवराया ॥२॥
कवणाची आस पाहूं कोणीकडे ।
जीवींचें सांकडें वारीं देवा ॥३॥
गहिंवर नावरे चोखियाचे मनीं ।
धांवें चक्रपाणी देवराया ॥४॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.
भवाचिया भेणें येतों – संत चोखामेळा अभंग – ३१८