संत ज्ञानेश्वर महाराज अभंग

स्वर्ग जयाची साळोंखा – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ४४

स्वर्ग जयाची साळोंखा – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ४४


स्वर्ग जयाची साळोंखा ।
समुद्र पाळी पिंड देखा ।
शेषासरिखी बैसका ।
जो आधार तिही लोकीं ॥१॥
लिंग देखिलें देखिलें ।
त्रिभुवनीं विस्तारलें ॥२॥
मेघधारीं तपन केलें ।
तारापुष्पीं वरी पूजिलें ।
चंद्रफ़ळ ज्या वाहिलें ।
वोवाळिलें रविदीपें ॥३॥
आत्मनैवेद्य समर्पिलें ।
ब्रह्मानंद मग वंदिलें ।
ज्योतिर्लिंग मग ध्याईलें ।
ज्ञानदेवीं ह्रदयीं ॥४॥

अर्थ:-
ज्याची साळुंखा स्वर्गाला भिडली आहे. व खालच्या पिंडीने समुद्राचा ठाव घेतला आहे. जो शेषासारखी बैठक करुन बसला आहे. तो ह्या तिन्ही लोकांचा आधार आहे. असे परमात्मतत्व लिंग स्वरुपात मी पाहिले व ते त्रिभुवनात विस्तारलेले आहे. त्याचे स्नान मेघधारा घडवतात. त्याची पुजा तारापुष्प अर्पून होते. त्याला चंद्राचा फळ म्हणूुन नैवेद्य दाखवतात व सुर्याला घेऊन त्याचे औक्षण करतात. त्याला आत्मनैवेद्य लागतो. ब्रह्मानंदी मन त्याला अर्पण करावे लागते. असे जोर्तिलिंग माऊली ज्ञानेश्वर आपल्या हृदयात ध्यात आहेत.


स्वर्ग जयाची साळोंखा –

स्वर्ग जयाची साळोंखा

संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड रा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *