संत ज्ञानेश्वर महाराज अभंग

काळेपणाचा आवो अंबरीं बाणला – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ४७

काळेपणाचा आवो अंबरीं बाणला – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ४७


काळेपणाचा आवो अंबरीं बाणला ।
तो एकु दादुला देखिला डोळां ॥१॥
काळें मनुष्य मानव जालें ।
अरुप रुपा आलें गोविंदपणें ॥ध्रु०॥
रखुमादेविवरु विठ्ठलु सोहंधरु ।
त्यानें माझा वेव्हारु बहु काळें नेलागे माये ॥२॥

अर्थ:-
संपुर्ण गगनातील सावळेपण अंगावर असलेला तोच एक पती म्हणुन मी डोळ्याने पाहात आहे. असा सावळा वर्ण असलेला मानव बनुन आलेला ते अरुप असलेले गोविंद रुपास आले आहेत. असा जो निर्गुण असलेला सगुण होऊन माझे सर्व व्यवहार खुंटवले तो रखुमाईचा पती व माझा पिता विठ्ठल आहे असे माऊली सांगतात.


काळेपणाचा आवो अंबरीं बाणला – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ४७

संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड रा.

1 thought on “काळेपणाचा आवो अंबरीं बाणला – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ४७”

  1. कठीण श्लोक आहे पण अर्थ समजल्यावर आनंद वाटला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *