संत ज्ञानेश्वर महाराज अभंग

नवल देखिलें कृष्णरुपीं बिंब – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ५

नवल देखिलें कृष्णरुपीं बिंब – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ५


नवल देखिलें कृष्णरुपीं बिंब ।
सांवळी स्वयंभ मूर्ति हरिची ॥१॥
मन निवालें बिंबलें समाधान जालें ।
कृष्णरुपें बोधलें मन माझें ॥ध्रु०॥
बापरखुमादेविवरु सांवळा सर्व घटीं ।
चित्तें चैतन्या मिठी घालिताखेवों ॥२॥

अर्थ:-
त्या सावळ्या कृष्णाची स्वयंभु मूर्ती मी पाहिली व मला त्याचे नवल वाटले. त्या कृष्णरुपाच्या बोधामुळे माझे समाधान झाले व मन शांत झाले. तो रखुमाईचा पती व माझे पिता सर्वांमध्ये चैतन्यरुपाने असुन त्याला मी मिठीत कवळुन घेत आहे. असे माऊली सांगतात.


वरील अभंग व्हिडिओ स्वरूपात पहा 


नवल देखिलें कृष्णरुपीं बिंब – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ५

संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड रा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *