संत ज्ञानेश्वर महाराज अभंग

राम बरवा कृष्ण बरवा – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ५०

राम बरवा कृष्ण बरवा – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ५०


राम बरवा कृष्ण बरवा ।
सुंदर बरवा बाइयांनो ॥१॥
केशव बरवा माधव बरवा ।
गोपाळ बरवा बाइयांनों ॥२॥
बाप रखुमादेविवरु त्रिभुवनीं गरुवा ।
विठ्ठलु बरवा बाइयांनो ॥३॥

अर्थ:-
विठ्ठल बरवा बाईयानों ॥ हे जीवरुपी सखी राम व कृष्ण चांगले आहेत व ते अतिषय सुंदर आहेत. केशव, माधव व गोपाळ रुपातही तो सुंदर आहे. त्रिभुवनाचा गौरव असलेला तो विठ्ठल चांगला असुन रखुमाईचा पती आहे असे माऊली सांगतात.


राम बरवा कृष्ण बरवा – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ५०

संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड रा.

1 thought on “राम बरवा कृष्ण बरवा – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ५०”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *