संत ज्ञानेश्वर महाराज अभंग

साती बारी दोन्ही आपणचि होऊनि – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ५१

साती बारी दोन्ही आपणचि होऊनि – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ५१


साती बारी दोन्ही आपणचि होऊनि ।
सुरतरु माझारी वोळगे ॥
तळीं त्रिभंगी मांडूनि ठाण घेऊनि मेघाचें मान ।
विजु एकी वेढुन बरवे गर्जतुगे माये ॥१॥
नवलावोगे माये न्याहाळितां कैसे मनाचे नयन उमलताती ॥
तीही एक दृष्टि जिव्हा लाभती तरी ।
सुलभु देखतां बोलतीगे माये ॥ध्रु०॥
पाहो याचे पाय । शंभूचिया माथां माये ।
सासिन्नली चंद्रदाहें गंगेतें ॥
तेथ असुराची शिरें । येथे सकळ शरीरें ।
तोडराचेनि बडिवारें । बरीजतुगे माये ॥२॥
तेज सांवळें । रुप लाधलें परिमळें ।
अनंगाचेनि सळें । कासीं कासियेला ॥
तो पालउ पांढर गळे । होतुकां जगाचे डोळे ।
दुरुनियां सुनिळें । रोविलेंगे माये ॥३॥
उपनिषदाचा गाभा । माजी सौंदर्याची शोभा ।
मांडिला दोखांबा । तैसा दिसे देखा ॥
वेगळालिया कुंभस्थळा । परि हातु सरळा ।
पालटु बांधला माळा । मेखळा मिसेंगे माये ॥४॥
भलतेउते वाहे न वाहे नदी । जेंवीं स्थिरावे अगाधीं ।
तैसी पुंजालता हे मंदी । दोही वेदांची ॥
वरिलिया वक्षस्थळा । नुपुरे स्थानीचा डोळा ।
मागुन निघे कमळा । नव्हे रोमराजी ॥५॥
लावण्य उदधी वेळा । तेंचि पै वैजयंती माळा ।
वरी शोभतसे सोहळा । साहकारवेचा ॥
म्हणे प्रेम पुष्कळा । थडिये लाभे सकळा ।
नयनसुखाच्या सुकाळा । जग मेळवितुगे माये ॥६॥
भोंवतीं तारागणें पुंजु । मांजी अचळ सुरिजु ।
आला वक्षस्थळा उजु । तैसा दिसे देखा ॥
जेवणे न अंगें । उभऊनि श्रीकरायोगें ।
योगनादातटी रंगे । नभु दुमदुमितवो माये ॥७॥
इंद्रधनुष्य काढिलें । तया तळीं बहुडलें ।
तेचि कुरुळीं वेढिलें । समाधिसुख देखा ॥
आवारीचा गुणु । श्रुतीगर्भी समवर्णु ।
दोही स्वरीं गोडी वेणु । जग निववीतुवो माये ॥८॥
या वेधितां कांहींच नुरे । रुपा आले हेंचि खरें ।
वरी दाविता हे माजिरें । गोपवेशाचें ॥
तमावरी हातियारे । रविकाज काईयेरे ।
तैसा रखुमादेविवरें । विरें घेतलेंगे माये ॥९॥

अर्थ:-
बाजारात येणारा व जाणारा आपणच होऊन, म्हणजेच देव व भक्त तुच होऊन त्या सुरतरु खाली दिडका होऊन उभा आहेस व मेघाचे पांघरुण करुन वीजे सारखा गर्जत आहेस. हे नवल पाहायला मनाचे कसे डोळे उघडतात हे ही नवलच ती दृष्टी जिव्हेला लागुन ती सुलभ पणे संवाद करत आहे. अंगाचा दाह शमवण्यासाठी चंद्र व गंगा धारण करणाऱ्या महादेवाचे पाय तो धरत आहे. त्याच्या समोर असुर मस्तके झुकली तो पायातील तोडरांच्या आवाजाने गर्जना करतो आहे. माझ्या डोळ्यांना ते सुगंधीत तेजपुंज रुप लाभले आहे. त्याने घातलेला पितांबर मदनाला ही फिका करतो. ते पाहुन जगाचे डोळे पांढरे होतात. ते पाय रोऊन उभे राहिलेले सावळे रुप लांबुन लोभस दिसते.तो उपनिषदांचा गाभा सर्वामध्ये सौदर्याची शोभा होऊन खांबां सारख्या दोन पायांवर उभा आहे.कुंभस्थळ म्हणजे मस्तक व दोन हात सरळ व कमरेला बांधलेला शेला व त्यावर मेखळा त्याला शोभत आहे. समुद्राच्या ठिकाणी अवखळ नदी जशी स्थिर होते तसे त्याचे वर्णन करताना वेद स्थिरावतात.त्याच्या छातीवर नजर स्थिरावत नाही.व अंगावरच्या रोमासारखी लक्ष्मी त्याच्या मागे असते.गळ्यातील वैजंयती माळा लावण्याच्या शोभेचा सोहळा दाखवते. भक्ताच्या प्रेमाकरता तो ऐल थडी आला त्यामुळे नयन सुखाचा सोहळा जगाला मिळत आहे. चांदण्यात चंद्र शोभतो,तशी त्याच्या वक्षस्थळांची शोभा उठून दिसते.उजवा हात वर करून मुरली वाजवित त्या ध्वनीतच कृष्ण रंगून गेला आहे व त्या ध्वनीने आकाश दुमदुमीत झाले आहे. त्याचे कुरळे केस इंद्रधनुष्याने रंगवले असून त्याच्याखाली समाधी सुख आहे. त्याच्या ओठातील ध्वनीच्या मुरलीत श्रुतींच्या गर्भातील समवर्ण आहे व ते गोड स्वर जगाला निमवित आहेत.याच्या रूपाचे वेध लागल्यावर काही उरत नाही.अशा त्या उपवेशाने आलेल्या कृष्णाने मन वेधले आहे. जसे अंधारावर सूर्याचा उपाय तसाच विठ्ठलाने गोप वेष घेतला आहे असे माऊली म्हणतात.


साती बारी दोन्ही आपणचि होऊनि – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ५१

संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड रा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *