संत ज्ञानेश्वर महाराज अभंग

एकतत्त्व नाम दृढ धरी मना – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ७६२

एकतत्त्व नाम दृढ धरी मना – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ७६२


एकतत्त्व नाम दृढ धरी मना ।
हरिसि करुणा येइल तुझी ॥१॥
तें नाम सोपेरे रामकृष्णगोविंद ।
वाचेशी सदद जपे आधीं ॥२॥
नामापरतें तत्त्व नाहीरे अन्यथा ।
वायां आणिका पंथा जाशी झणी ॥३॥
ज्ञानदेवा मौन जपमाळ अंतरी ।
धरोनी श्रीहरि जपे सदां ॥४॥


एकतत्त्व नाम दृढ धरी मना – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ७६२

संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड रा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *