संत ज्ञानेश्वर महाराज अभंग

पावया लुब्ध जाल्या पाबळा – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ८४

पावया लुब्ध जाल्या पाबळा – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ८४


पावया लुब्ध जाल्या पाबळा ।
गाई परे बळारे कान्हो ॥१॥
विसरल्या चार विसरल्या पार ।
तल्लीन साचार कृष्णमूर्तिं ॥ध्रु०॥
पाणिया निघाल्या गाई चरती कळंबा ठाई ।
हाकितसे लवलाही सवंगडा ॥२॥
ज्ञानदेवी गाई हाकितु पारे सोई ।
हरिनाम दोही सत्राविये ॥३॥

अर्थ:-
कृष्णाच्या बासरीच्या मधुर स्वरांनी त्या गाई मुग्ध झाल्या. त्यांना परत चाऱ्याकडे वळा. त्या गाई कृष्णाला पाहून तल्लीन झाल्या व चारा खायच्या विसरल्या नंतर कळंब वृक्षाच्या खाली असणाऱ्या गाईंना सवंगडी हाकारत होते.हरिनामाच्या गाई हाकल्याने त्या सवंगड्यांना सतरावी जीवन कळा प्राप्त झाली असे माऊली सांगतात.


पावया लुब्ध जाल्या पाबळा – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ८४

संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड रा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *