परिवर्तिनी एकादशी

परिवर्तिनी एकादशी

माहिती व्हिडीओ स्वरूपात पहा :-


भाद्रपद महिन्यातील शुद्ध पक्षात येणारी एकादशी परिवर्तिनी एकादशी या नावाने ओळखली जाते. प्रत्येक महिन्यात येणाऱ्या एकादशींच्या नावावरून त्याचे वेगळेपण आणि महत्त्व विषद होते. परिवर्तिनी एकादशीला काही शुभ योग जुळून येत आहेत. परिवर्तिनी एकादशीचे व्रताचरण, पूजनविधी, महत्त्व, मान्यता यांविषयी माहिती पुढीलप्रमाणे,

आषाढी एकादशीपासून सुरू होणारा चातुर्मासाचा सात्विक काळ हा व्रत-वैकल्ये, सण-उत्सव यांसाठी विशेष करून ओळखला जातो. चातुर्मासाचा प्रारंभ आणि सांगता एकादशीच्या व्रताने केली जाते. चातुर्मासातील पहिल्या श्रावण महिन्यात व्रत-वैकल्यांची अगदी रेलचेल असते. गोकुळाष्टमीनंतर सर्वांना वेध लागतात गणेश चतुर्थी म्हणजेच ते लाडक्या गणपती बाप्पाच्या आगमनाचे. प्रत्येक मराठी महिन्याच्या शुद्ध पक्षात आणि वद्य पक्षात एकादशी येते. या प्रत्येक एकादशीचे महत्त्व आणि मान्यता अगदी वेगवेगळ्या आहेत. भाद्रपद महिन्यातील शुद्ध पक्षात येणारी एकादशी परिवर्तिनी एकादशी या नावाने ओळखली जाते.

प्रत्येक महिन्यात येणाऱ्या एकादशींच्या नावावरून त्याचे वेगळेपण आणि महत्त्व विषद होते. यंदाच्या सन २०२१ मधील चातुर्मासाचे वैशिष्ट्य म्हणजे यावर्षी अश्विन पुरुषोत्तम महिना असल्याने हा काळ पाच महिन्यांचा झाला आहे. अधिक महिन्यात येणाऱ्या एकादशीला विशेष महत्त्व असल्याचे सांगितले जाते. परिवर्तिनी एकादशीला काही शुभ योग जुळून येत आहेत. परिवर्तिनी एकादशीचे व्रताचरण, पूजनविधी, महत्त्व, मान्यता यांविषयी माहिती पुढीलप्रमाणे,


 महत्त्व

आषाढी एकादशीपासून श्रीविष्णू शयन करतात, अशी मान्यता आहे. म्हणूनच याला देवशयनी एकादशी असेही म्हणतात. हा काळ कार्तिकी एकादशीपर्यंत असतो. भाद्रपद महिन्यातील शुद्ध पक्षात येणाऱ्या एकादशीला श्रीविष्णू शयनावस्थेत असताना कूस बदलतात. यामुळे विष्णूंच्या स्थानात बदल होतो, म्हणून या एकादशीला परिवर्तिनी एकादशी असे संबोधले जाते, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. यासाठी या एकादशीचे व्रत महत्त्वाचे मानले गेले आहे. परिवर्तिनी एकादशीचे व्रत केल्याने वाजपेय यज्ञाचे पुण्यप्राप्ती होते. या एकादशीला केलेल्या श्रीविष्णू पूजनामुळे मोक्षप्राप्ती होते, असे सांगितले जाते.


 मुहूर्त

भारतीय पंचांगानुसार, सूर्योदयाची तिथी मानण्याची प्राचीन परंपरा असल्याने परिवर्तिनी एकादशी व्रताचे आचरण शुक्रवार , १७ सप्टेंबर २०२१ रोजी करावे, असे सांगितले जाते.

शुक्रवार , १७ सप्टेंबर २०२१ रोजी येणाऱ्या परिवर्तिनी एकादशीला अनेक शुभ योग जुळून येत आहेत. यामुळे एकादशीचे महत्त्व दुपटीने वाढले असल्याचे सांगितले जात आहे. परिवर्तिनी एकादशी तिथी सकाळी समाप्त होत असल्याने एकाच दिवशी एकादशी आणि द्वादशी अशा दोन तिथी येत आहेत. भाद्रपद शुद्ध द्वादशी वामन जयंती म्हणून ओळखली जाते. श्रीविष्णुंचा पाचवा अवतार मानल्या गेलेल्या वामनाचा जन्मोत्सव देशभरात साजरा केला जातो. त्याचप्रमाणे या दिवशी आयुषमान योग जुळून येत आहे. या योगावर करण्यात आलेले विष्णूपूजन सुख, शांतता, समृद्धी, सुविधांमध्ये वृद्धी करणारे ठरते, असे सांगितले जाते.


 व्रतपूजन

परिवर्तिनी एकदशीचे व्रताचरण करणाऱ्यांनी पहाटे नित्यकर्म आटोपल्यानंतर परिवर्तिनी एकादशी व्रत आणि श्रीविष्णू पूजनाचा संकल्प करावा. श्रीविष्णूंचे आवाहन करावे. श्रीविष्णूंची चौरंगावर स्थापना करावी. यानंतर पंचामृत अभिषेक करावा. त्याच पंचामृताचा नंतर नैवेद्य दाखवावा. मुख्य अभिषेक करावा. अभिषेक झाल्यानंतर वस्त्र, गंध, अक्षता, तुळशीची पाने, ऋतुकालोद्भव फुले, फळे श्रीविष्णूंना अर्पण करावीत. धूप, दीप आणि नैवेद्य दाखवून श्रीविष्णूंची आरती करावी. मनापासून नमस्कार करून सर्वांना प्रसादाचे वाटप करावे. शक्य असल्यास विष्णू सहस्रनामाचे पठण करावे. यथाशक्ती दान करावे.


 व्रताची सांगता

परिवर्तिनी एकादशीचे व्रत आचरणाऱ्यांना मनात कोणत्याही प्रकारचा संशय ठेऊ नये. व्रतदिनी केवळ फलाहार घ्यावा. ज्यांना केवळ फलाहार करणे शक्य नाही, त्यांनी सात्विक आहार घ्यावा. शक्यतो कांदा, लसूणयुक्त उग्र पदार्थ खाणे टाळावे. एकादशी दिनी केलेल्या व्रतानंतर दुसऱ्या दिवशी उठून स्नानदिक कार्ये आटोपल्यानंतर की, एकादशी व्रत सांगतेचा संकल्प करून तो पूर्ण करावा. यावेळी श्रीविष्णूंची मनोभावे पूजा करावी. व्रताच्या यशस्वीतेसाठी श्रीविष्णूंचे आभार मानावेत. व्रत आचरण काळात कोणाबाबतही अपशब्द बोलू नयेत. पूजा करताना कोणाच्याही बाबतीत मनात ईर्ष्या उत्पन्न करू नये. तसेच व्रताचरण करताना अनावधानाने झालेल्या चुकांबाबत श्रीविष्णूंकडे क्षमायाचना करावी.


​परिवर्तिनी एकादशी माहिती समाप्त 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *