Putrada Ekadashi information marathi video
पुत्रदा एकादशीच्या दिवशी भगवान श्री विष्णूची विधिवत पूजा करून उपवास केल्याने व्यक्तीला संततीचे वरदान मिळते असे मानले जाते. हिंदू कॅलेंडरनुसार महिन्याच्या दोन्ही पक्षात, कृष्ण पक्ष आणि शुक्ल पक्षातील अकरावा दिवस एकादशी म्हणून साजरी केली जातो.
पुत्रदा एकादशी वर्षातून दोन वेळा येते. त्यातील पहिली पौष महिन्यात आणि दुसरी श्रावण महिन्यात येते. पौष महिन्यातील शुक्ल पक्षात येणारी एकादशी पौष पुत्रदा एकादशी म्हणून साजरी केली जाते.
पुत्रदा एकादशीचे महत्त्व – Putrada Ekadashi importance
पुत्रदा एकादशीला भगवान विष्णूची विधिवत पूजा करून व्रत केल्यास पुत्रप्राप्तीची इच्छा पूर्ण होते अशी श्रद्धा आहे.
जे लोक हे व्रत करतात त्यांच्यावर भगवान श्री विष्णूची अपार कृपा असते आणि त्यांच्या मनोकामना पूर्ण होतात असेही मानले जाते. जे लोक वर्षातून दोनदा हे व्रत करतात त्यांना मोक्ष प्राप्त होतो आणि त्यांच्या मुलांना आरोग्याचे वरदान मिळते अशी मान्यता आहे.
पुत्रदा एकादशीची पूजा विधी – Putrada Ekadashi puja vidhi
एकादशीच्या व्रताचे नियम दशमीच्या तिथीपासून लागू होतात त्यामुळे दशमीच्या दिवशीही कांदा-लसूण खाऊ नये. द्वादशीला उपवास सोडावा. तुम्हाला एकादशीचे व्रत करायचे असेल तर दशमीच्या दिवशी सूर्यास्तापूर्वी भोजन करावे.
पुत्रदा एकादशीच्या दिवशी सकाळी सूर्योदयापूर्वी उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे. या दिवशी गंगेत स्नान करण्याचा नियम आहे. पण जर तुम्हाला हे जमत नसेल तर तुम्ही आंघोळीच्या पाण्यात गंगाजल मिसळू शकता. स्नानानंतर भगवान श्री विष्णूची विधीवत पूजा करा. पंचोपचार विधीने भगवान श्री विष्णूची पूजा करून त्यांना धूप, दीप, फुले, अक्षता, रोली, फुलांच्या माळा आणि नैवेद्य अर्पण करा आणि व्रताचा संकल्प घ्या.
पूजेनंतर पुत्रदा एकादशी व्रताची कथा वाचा आणि दिवसभर उपवास ठेवा. रात्री फळे खावीत आणि द्वादशीच्या दिवशी स्नान करून ब्राह्मणांना खाऊ घालावे आणि स्वतः सेवन करावे.
पुत्रदा एकादशीचे नियम – Putrada Ekadashi rules
ज्यांनी पुत्रदा एकादशीचे व्रत केले आहे त्यांनी लसूण, कांदा विरहित अन्न खावे. यासह, मनाने आणि शब्दाने ब्रह्मचर्य पाळावे. दशमीपासून द्वादशीपर्यंत भगवान विष्णूचे ध्यान करावे.
व्यक्तीने एखाद्या दिवशी उपवास केला नाही, त्यांनी एकादशीच्या दिवशी तामसिक अन्न देखील वर्ज्य करावे. यासह, खोटे बोलणे, अनैतिक कृत्ये करणे, राग-लोभ इत्यादी गोष्टींपासून अंतर ठेवले पाहिजे.
एकादशीच्या दिवशी वैष्णव धर्माचे पालन करावे लागते, त्यामुळे वांगी, सुपारी, मांस-दारू इत्यादी गोष्टींपासून स्वतःला दूर ठेवा. या दिवशी कांस्य भांड्यात अन्न खाऊ नका.
पुत्रदा एकादशी व्रत कथा – Putrada Ekadashi vrat katha
पुराणकाळात महिष्मतीपुरी नावाचा एक शांतीप्रिय, धर्मप्रिय असा एक राजा था. मात्र त्याला स्वत:च मूल नव्हतं. मग त्याच्या शुभचिंतकांनी एक लोमेश ऋषीला याचे कारण विचारले असता, त्यांनी सांगितले की, मागच्या जन्मी महिष्मतीपुरी राजा हा एक अत्याचारी, निर्दयी असा राजा होता.
मागच्या जन्मी याच एकादशी दिवशी तहानलेला हा राजा पाणी पिण्यासाठी एक जलाशयाजवळ पोहोचला. तेव्हा तिथे नुकतीच बाळंतिण झालेली गाय पाणी पिण्यासाठी आली होती. मात्र राजाने तिला तेथून हटकले. त्याच्या ह्या दुष्कर्मामुळे तो याजन्मी पिता बनू शकणार नाही. त्यामुळे जर त्याला या शापातून मुक्त करायचे असेल तर, तुम्हाला हे व्रत करावे लागेल आणि त्याचे पुण्य तुमच्या राजाला द्यावे लागेल. तरच त्यांनी संततीप्राप्ती होईल. या ऋषीमुनींच्या निर्देशानुसार, प्रजासह राजानेसुद्धा हे व्रत केले. त्यानंतर काही काळानंतर राणीने एक गोंडस बाळाला जन्म दिला. तेव्हापासून एकादशीला श्रावण पुत्रदा एकादशीचे व्रत केले जाते.