ekadashi

एकादशी का करतात

पद्मपुराणामध्ये एकादशी (ekadashi) व्रताचे पुढीलप्रमाणे महत्त्व सांगितले आहे.

अश्वमेधसहस्त्राणि राजसूयशतानि च ।
एकादश्युपवासस्य कलां नार्हन्ति षोडशीम् ।। – पद्मपुराण

अर्थ : अनेक सहस्र अश्वमेध यज्ञ आणि शेकडो राजसूय यज्ञ यांना एकादशीच्या उपवासाच्या सोळाव्या कले इतकेही, म्हणजे ६ १/४ प्रतिशत इतकेही महत्त्व नाही.

‘एकादशीच्या दिवशी ब्रह्मांडात कार्यरत असणार्‍या विष्णुतत्त्वामुळे वायूमंडल विष्णुतत्त्वयुक्त लहरींनी भारित असते. त्यामुळे एकादशीच्या दिवशी तुळस विष्णुतत्त्वाच्या लहरी जास्त प्रमाणात ग्रहण करते आणि त्यामुळे तिची आध्यात्मिक स्तरावर कार्य करण्याची क्षमता वाढते.’ – कु. मधुरा भोसले, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.


एकादशीचा उपवास:

‘पंधरा दिवसांतून एक दिवस संपूर्ण उपवास केल्यास तो शरिराच्या दोषांना जाळून टाकतो आणि १४ दिवसांत आहाराचा जो रस बनतो, त्याचे ओजात रूपांतर होते; म्हणूनच एकादशीच्या उपवासाचा महिमा आहे. एरवी गृहस्थाश्रमींनी मासातील केवळ शुक्लपक्षातील एकादशीचा उपवास करावा, असे आहे; परंतु चातुर्मासात दोन्ही पक्षांतील एकादशीचे व्रत करावे.’ एकादशीचे लाभ ‘पद्मपुराणा’मध्ये एकादशीचे पुढीलप्रमाणे लाभ सांगितले आहेत.

स्वर्गमोक्षप्रदा ह्येषा शरीरारोग्यदायिनी ।
सुकलत्रप्रदा ह्येषा जीवत्पुत्रप्रदायिनी ।
न गंगा न गया भूप न काशी न च पुष्करम् ।
न चापि वैष्णवं क्षेत्रं तुल्यं हरिदिनेन च । – पद्मपुराण आदिखंड

अर्थ : एकादशी (ekadashi) ही स्वर्ग, मोक्ष, आरोग्य, चांगली भार्या आणि चांगला पुत्र देणारी आहे. गंगा, गया, काशी, पुष्कर, वैष्णव क्षेत्र यांपैकी कोणालाही एकादशीची बरोबरी करता येणार नाही. एकादशीला हरिदिन विष्णूचा दिवस, असे संबोधतात.

देवता: एकादशी (ekadashi) या व्रताची देवता श्रीविष्णु आहे.

प्रकार: एकादशीचे स्मार्त आणि भागवत असे दोन प्रकार आहेत. ज्या वेळी एका पक्षात हे दोन भेद संभवतील, त्या वेळी पंचांगात पहिल्या दिवशी स्मार्त आणि दुसर्‍या दिवशी भागवत एकादशी असे लिहिलेले असते. शैव लोक स्मार्त एकादशी, तर वैष्णव लोक भागवत एकादशी पाळतात. प्रत्येक मासात दोन, याप्रमाणे वर्षात चोवीस एकादश्या येतात. इतर व्रतांप्रमाणे हे व्रत संकल्पाने विधीपूर्वक चालू करावे लागत नाही.

काळानुसार प्रत्येकातील सत्त्व, रज आणि तम गुणांचे प्रमाण पालटत असते. एकादशीच्या दिवशी सर्व प्राणिमात्रांची सात्त्विकता सर्वांधिक असते. त्यामुळे या वेळी साधना केल्यास त्याचा जास्त लाभ होतो.


व्रत करण्याची पद्धत:

एकादशीला काहीएक न खाता केवळ पाणी आणि सुंठसाखर घेतल्यास ते सर्वोत्तम होय. ते शक्य नसल्यास उपवासाचे पदार्थ खावे. एकादशीला उपवास करून दुसर्‍या दिवशी पारणे करतात.

पुण्यसंचय व्हावा, या सद्हेतूने एकादशीकडे पहाणे अयोग्य आहे. एकादशी व्रत केल्याचे सर्वंकश लाभ समाज, राष्ट्र आणि व्यक्ती यांना झाले आहेत अन् होणार आहेत. हिंदु धर्माच्या प्रत्येक मासात दोन एकादशी येतात. पहिल्या पंधरवड्यात ‘स्मार्त’ ही शंकराची आणि दुसर्‍या पंधरवड्यात ‘भागवत’ ही विष्णूची एकादशी येते. हिंदु धर्माच्या सर्व मासांतील तिथी चंद्राच्या भ्रमणावर निर्मिलेल्या आहेत. अमावास्या ते पौर्णिमा यांच्या मधल्या पंधरवड्यास ‘शुक्ल पक्ष’ आणि पौर्णिमा ते अमावास्या यातील पंधरवड्यास ‘कृष्ण पक्ष’, असे संबोधतात. यात चांद्रवर्षाप्रमाणे प्रती मासाला दोन एकादशी येतात. गोत्रवध दोषाच्या नाशासाठी श्रीकृष्णाने धर्मराजाला एकादशी व्रत करण्यास सांगितले होते.

महाभारत युद्धामध्ये गोत्रवध झाल्यामुळे धर्मराजाने ‘गोत्रवध दोषाच्या नाशासाठी काय करावे ?’, असे कृष्णाला विचारले असता श्रीकृष्णाने ‘एकादशी (ekadashi) व्रत केल्याने गोत्रहत्यादोष नाहीसा होईल’, असे त्याला सांगितले. या व्रताचे आचरण केले असता, महापातकाचा नाश होईल आणि सर्व दोष नष्ट होतील.

पौराणिक कथांमध्ये मानवावर संस्कार करण्याची क्षमता असून व्रतवैकल्यांमध्ये लपलेल्या विज्ञानामुळे मानवाचे कल्याण होणार असण आपल्या पौराणिक कथांमध्ये एक वैचारिक सूत्र असते. त्याचप्रमाणे त्यांमध्ये मानवावर संस्कार करण्याची क्षमता असते. इतकेच नव्हे, तर या व्रतवैकल्यांमध्ये मानवाला कल्याणकारी असे विज्ञानही लपलेले असते.

सरळ रूपाने ‘एकादशी उपवास करा’, असे सांगितले, तर लोक सिद्ध होतातच असे नाही; म्हणून त्यांना पुण्य आणि मोक्ष यांच्या प्राप्तीसंदर्भात सांगितले जाते. ‘या उपवासांनी सर्व पातकांचा नाश होऊन ऐश्वर्य अन् आरोग्य संपन्नता प्राप्त होईल’, असे लोकांना सांगितले जाते.


शरीर निरोगी रहाण्यासाठीही एकादशी महत्त्वाची !

आपले शरीर पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या पंचमहाभूतांनी बनलेले असून या पंचमहाभूतातील पंचतत्त्वे आपल्या शरिरात कार्यरत असतात. या सर्वांचा आपल्या शरिरावर परिणाम होत असतो. वातावरणातील असंतुलन आपल्या आरोग्यावर (अनिष्ट) परिणाम करत असते. त्यामुळे आपले शरीर निरोगी रहाण्यासाठी एकादशी व्रत करणे महत्त्वाचे आहे. शरीर निरोगी आणि प्रतिकारक्षम बनवणे अन्
चंद्राच्या कारकत्वाला प्रतिकार करणे यांसाठी एकादशीचा उपवास आरोग्याला आवश्यक !

‘एकादशीनंतर पौर्णिमा आणि अमावास्या या दोन तिथी येतात. त्या वेळी आकाशात पूर्ण चंद्र आणि अस्तंगत चंद्र असतो. चंद्र हा मनाचा कारक आहे. त्याप्रमाणे तो जलावरही परिणाम करतो. अमावास्या आणि पौर्णिमा या तिथींना समुद्राला येणारी भरती-ओहोटी ही चंद्राचा समुद्रातील पाण्यावर होणारा परिणाम दर्शवते. त्याचप्रमाणे भूपृष्ठावरील आणि मानवी शरीरातील पाणी यांवरही चंद्राचा परिणाम होत असतो. शरीरातील जलतत्त्व आणि मन यांवर चंद्राचा परिणाम झाल्यामुळे फेपरे येणे, ‘फिट्स’ येणे, शरीर कमकुवत होणे इत्यादी आजार होण्याची शक्यता असते. त्यामुळे शरीर निरोगी आणि प्रतिकारक्षम बनवणे अन् चंद्राच्या कारकत्त्वाला प्रतिकार करणे यांसाठी एकादशीचा उपवास आरोग्याला आवश्यक आहे.


शेतमालाची मोफत जाहिरात करण्यासाठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या

एकादशी – ekadashi fast – ekadashi fasting – why to fast on ekadashi – ekadashi in marathi

17 thoughts on “एकादशी का करतात”

 1. दिलीप लोणकर अकलूज

  एकादशी व्रत, खूप छान माहिती.

 2. मनोहर चिंतामणी सातपुते. मोबाइल नंबर 7841804003

  अत्यंत उपयुक्त अशी माहिती ह्या मेसेजद्वारे मिळाली.माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. जय जय रम कृष्ण हरी माउली.
  ,दंडवत, प्रणाम.

 3. हभप नंदकुमार महाराज सोनमळे म्हसवेकर सातारा महाराष्ट्र

  अतिशय सुंदर माहिती दिली आहे धन्यवाद राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी

 4. अतिशय सुंदर अन् उपयुक्त माहिती मिळाली. खूप खूप धन्यवाद ?

 5. सतीश कुलकर्णी

  ऐकादशी का करावी? वैज्ञानिक रीते उपयोगी माहिती मिळाली

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *