राम

राम नवमी

चैत्र शुद्ध नवमी हा हिंदू पंचागानुसार चैत्र महिन्यातील नवरात्राचा नववा दिवस आहे. या तिथीस भगवान विष्णूचा सातवा अवतार समजले गेलेले श्री राम यांचा जन्म झाला, अशी मान्यता आहे.. हा दिवस श्री राम नवमी म्हणून साजरा करतात. त्या दिवशी दुपारी सूर्य डोक्यावर आल्यावर (दुपारी १२.०० वाजता) रामजन्माचा सोहळा होतो.श्री रामांच्या चित्रास वा मूर्तीस इतर हारांसमवेतच गाठीपण घालतात.श्री रामांची पूजा करताना त्यानां करंगळीजवळच्या बोटाने, म्हणजेच अनामिकेने गंध लावतात.. तसेच श्री रामांना हळद-कुंकू वहातांना आधी हळद अन् नंतर कुंकू, उजव्या हाताच्या अंगठा आणि अनामिका यांच्या चिमटीत घेऊन चरणांवर वाहतात.. श्रीरामांना केवडा, चंपा, चमेली अन् जाई ही फुले वाहतात.. त्यानंतर आरती करून प्रसाद वाटतात. रामजन्माच्या दिवशी साजर्‍या केल्या जाणाऱ्या उत्सवांत रामजन्माचा पाळणा अवश्य म्हटला जातो.

हे पण वाचा: श्री रामाची आरती

श्रीरामनवमीच्या दिवशी मठ-मंदिरात भजन,पूजन, कीर्तन, प्रवचन इत्यादी कार्यक्रम करून हा जन्मोत्सव सोहळा साजरा केला जातो. काही ठिकाणी तर गुढीपाडवा ते रामनवमी ह्या काळांत रामायण ग्रंथाचे वाचन, रामकथेचे निवेदन, गीत रामायणाचे गायन वगैरे कार्यक्रमही केले जातात. श्रीराम हे सर्व आबालवृद्धांची लाडकी देवता असल्यामुळे सर्व लहान थोर मंडळी ह्या उत्सवात भाग घेतात.


संत नामदेव सुद्धा लिहितात

उत्तम हा चैत्रमास, ऋतू वसंताचा दिवस,

शुक्लपक्षी ही नवमी, उभे सुरवर व्योमी,

माध्यान्हासी ये दिनकर, पळभरी होई स्थीर।।

अशा या शुभमुहूर्तावर प्रभू श्रीरामाचा जन्म झाला. राम आणि त्यांचे चरित्र आपल्या संस्कृतीला भूषणभूत आहे. राम आपल्या कुटुंबासाठी, धर्मासाठी आणि देशासाठी झटला. त्याला ‘मर्यादा पुरुषोत्तम’ म्हणून आपण गौरवतो. आजही त्याचे गुणगान सर्वत्र भक्तिभावाने केले जाते.

राजा दशरथाला संतती नव्हती. पुत्रकामेष्टी यज्ञानंतर त्याला राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न हे चार पुत्र झाले. श्रीरामचंद्र है भावडात वडील त्याच्या या तिन्ही भावंडांनी वडीलकीचा मान राखून त्याच्या आज्ञेत राहणे पसंत केले. रामाच्या चरित्राला जी उज्ज्वलता प्राप्त होते, ती तो आणि त्याचे कुटुंब यांनी परस्परांना जे सहकार्य दिले, परस्परांचे मान आणि स्थान वाढवण्यासाठी त्याला कष्ट उपसले याची कहाणी आहे. प्रभू श्रीरामचंद्राचा आदर्श आपल्या देशाने आणि संस्कृतीने चिरकाल बाळगला पाहिजे.

‘दास म्हणे रघुनाथाचा गुण घ्यावा’

अशा शब्दात समर्थ रामदासस्वामींनी गुणाढ्य रामचंद्राचा यथोचित गौरव केला आहे.


चैत्र शुक्ल प्रतिपदेपासून नवमीपर्यंत काळ हा ‘रामनवरात्र’ म्हणून ओळखला जातो. या काळाता रामायणाचे पारायण करणे, रामाच्या चरित्राचे, तसेच इतर काही धार्मिक ग्रंथाचे वाचन करे असे विधी ठिकठिकाणी आचरले जातात. चैत्र शुक्ल नवमीच्या दिवशी रामाचा माध्यान्ही जन्म झाला असल्यामुळे गावोगावी असलेल्या राममंदिरात त्याचा जन्मोत्सव साजरा केला जातो. त्याला पाळण्यात घालून ‘दशरथनंदना कुलभूषणा बाळा जो ‘रे’ ह्यांसारखी पाळण्याची गाणी म्हटली जातात. रामाला राक्षसांचा वैरी, रावणमर्दन राम म्हणून ओळखले जाते. राक्षस हे निशाचर भूतयांनी ही निशाचरांचीच असते, असे समजतात. भुतादिकांचा उपद्रव होऊन नये म्हणून रामनामाचा जप करणे हा उपाय सांगितला जातो. श्रीरामरक्षास्तोत्रदेखील

प्रसिद्ध आहे. रोज रामरक्षास्तोत्र म्हटले, तर जिभेला चांगले वळण लागते आणि उच्चार शुद्ध होतात. गुढीपाडवा ते रामनवमी

या नऊ दिवसात गीत रामायण ऐकावे किंवा रामायण वाचावे. त्यामुळे रामाच्या पराक्रमाचे, कुटुंबवत्सलतेचे, सत्यप्रियतेचे,

सत्वगुणांचे आकलन होते. रामाच्या उपासनेचे अनेक मार्ग आहेत. रामाचे मंत्रही अनेक आहेत. ‘दाशरथाय विद्महे, सीतावल्लभाय धीमही, तन्नो रामः प्रचोदयात!’ ही सुप्रसिद्ध रामगायत्री आहे. तिचे पठण करावे. रामजन्माच्या दिवशी साधारण १२ वाजून चाळीस मिनीटांनी रामजन्माच्या मुहूर्तावर श्रीराम जय राम जय जय राम’ हा जप करावा. तसेच पाळणा म्हणून, रामाला नैवेद्य दाखवून रामजन्म

भक्तिभावाने साजरा करावा.


राम नवमी – अगहन पंचमी

भारतभर रामजन्म हा चैत्र शुक्ल नवमीला झाला असे समजले जात असले तरी, ज्या अयोध्येत रामाचा जन्म झाला,

त्या अयॊध्येतील वैश्य समाज रामाचा जन्म मार्गशीर्ष महिन्यातील पंचमीला झाला असे मानतात.

त्या पंचमीला अगहन पंचमी म्हणतात. (मार्गशीर्षाला हिंदीत अगहन म्हणतात!)

याला आधार म्हणजे तुळशीदासाच्या ‘राम चरित मानसा’मधील खालील उल्लेख. :

मंगल मूल लगन दिनु आया|

हिम रिपु अगहन मासु सुहावा||

ग्रह तिथि नखतु जोगु वर बारू|

लगन सोधि विधि कीन्ह विचारू||शेतमालाची मोफत जाहिरात करण्यासाठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या

ref: wikipedia

1 thought on “राम नवमी”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *