aundha nagnath temple

श्रावणी सोमवार

श्रावणी सोमवार हा श्रावण महिन्यातील सोमवारचा दिवस आहे. श्रावण महिन्यात कुणी आठवड्यातल्या एखाद्या दिवशी उपवास करतात तर काही जणांचा संपूर्ण महिनाभर उपवास असतो… काही जण खास करून सोमवार पाळतात… पण, हा उपवास का पाळतात? या प्रश्नाचं उत्तर आज आपण जाणून घेणार आहोत… सोमवार हा शंकराचा वार म्हणून समजला जातो. मग, शंकराला खूश करण्यासाठी सोमवारच्या दिवशी अनेक महिला आणि अविवाहीत मुली उपवास करतात. देवांचा देव म्हणजे महादेव…. श्रावण महिन्यात संपूर्ण भारतात प्रत्येक मंदिरात घरात हर हर महादेव असे स्वर आपल्या कानावर पडतात. श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी सर्व महादेव मंदिरात महादेवाचे पूजन एका विशिष्ठ पद्धतीने केले जाते. याचे कारण म्हणजे श्रावण महिन्यात शिव आणि पार्वती यांच्या पूजनाचे महत्त्व हिंदू ग्रंथांमध्ये खूप अधिक प्रमाणात वर्णन केले आहे. श्रावण महिन्यातील महादेवाच्या पूजेला खूप फलदायी मानले गेले आहे. याचे एक कारण म्हणजे श्रावण महिन्याला शंकराच्या उपासनेचा महिना असे सांगितले आहे.

  • शिवामूठ:- तांदूळ , तीळ , मूग , जवस , सातू

श्रावणाची कथा: देवी सतीने तिचे पिता दक्षच्या घरी योगशक्तीने शरीराचा त्याग केला होता. त्याआधी देवी सतीने शंकराला प्रत्येक जन्मात पती स्वरुपात मिळवण्याचा प्रण केला होता. देवी सतीने त्यांच्या दुसऱ्या जन्मात पार्वती असे नाव घेऊन राजा हिमाचल आणि राणी मैना यांच्या घरात मुलीच्या रुपात जन्म घेतला. पार्वतीने श्रावण महिन्यात निराहार राहून कठोर व्रत करून महादेवाला प्रसन्न केले व विवाह केला. त्यानंतर महादेवाला श्रावण महिना विशेष झाला. यामुळेच श्रावण महिन्यात कुमारिका सुयोग्य वर प्राप्तीसाठी व्रत करतात.

 पौराणिक कथा: भगवान परशुरामांनी आपल्या आराध्य देव शिवाची याच महिन्यात नियमाने पूजा करून आपल्या कावड मध्ये गंगाजल भरून शिवाच्या देऊळात नेऊन शिवलिंगावर वाहिले होते. म्हणजेच कावडाची प्रथा चालविणारे भगवान परशुराम यांची पूजा देखील श्रावणाच्या महिन्यात केली जाते. भगवान परशुराम श्रावणाच्या महिन्याच्या दर सोमवारी कावडमध्ये पाणी भरून शिवाची पूजा करायचे. शिवांना श्रावणी सोमवार विशेष आवडतो. श्रावणात भगवान आशुतोषाचे गंगाजल आणि पंचामृताने अभिषेक केल्याने थंडावा मिळतो. असे म्हणतात की भगवान परशुरामांमुळेच श्रावण महिन्यात शिवाची पूजा आणि उपवास सुरू झाले.

https://www.krushikranti.com/

1 thought on “श्रावणी सोमवार”

  1. Did not know about Shravan somvar in detail. Though I go for walk them Shankar temple, I did not go out as was not feeling good
    Hope next Monday will bring good health and allow me to go to shiva temple

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *