बाई मी लिहिणें शिकलें - संत जनाबाई अभंग - ११४

दुःशासन द्रौपदीसी – संत जनाबाई अभंग – १३

दुःशासन द्रौपदीसी – संत जनाबाई अभंग – १३


दुःशासन द्रौपदीसी ।
घेउनी आला तो सभेसी ॥१॥
दुर्योधन आज्ञा करी ।
नग्न करावी सुंदरी ॥२॥
आतां उपाय कृष्णा काय ।
धांवें माझे विठ्‌ठल माय ॥३॥
निरी ओढितां दुर्जन ।
झालें आणिक निर्माण ॥४॥
ऐसीं असंख्य फेडिलीं ।
देवीं तितुकीं पुरविलीं ॥५॥
तया संतां राखिलें कैसें ।
जनी मनीं प्रेमें हांसे ॥६॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

दुःशासन द्रौपदीसी – संत जनाबाई अभंग – १३

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *