दळितां कांडितां – संत जनाबाई अभंग – १३१
दळितां कांडितां ।
तुज गाईन अनंता ॥१॥
न विसंबें क्षणभरी ।
तुझें नाम गा मुरारी ॥२॥
नित्य हाचि कारभार ।
मुखीं हरि निरंतर ॥३॥
मायबाप बंधुबहिणी ।
तूं बा सखा चक्रपाणी ॥४॥
लक्ष लागलें चरणासी ।
म्हणे नामयाची दासी ॥५॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.