बाई मी लिहिणें शिकलें - संत जनाबाई अभंग - ११४

पाणी तेंचि मेघ मेघ – संत जनाबाई अभंग – १६९

पाणी तेंचि मेघ मेघ – संत जनाबाई अभंग – १६९


पाणी तेंचि मेघ मेघ तेंचि पाणी ।
काय या दोन्हीपणीं वेगळीक ॥१॥
माती तेचि धूळ धूळ तेचि माती ।
भेंडा आणि भिंती काय दोन ॥२॥
साखरीं गोडी गोडी साखरेसी ।
थिजलें तुपासी काय दोन्ही ॥३॥
डोळा तें बुबुळ बुबुळ तो डोळा ।
शांति ज्ञानकळा काय भिन्न ॥४॥
वदन ते ओंठ ओंठ तें वदन ।
क्षेमआलिंगन काय दोन ॥५॥
जीभ ते पडजीभ पडजीभ ते जीभ ।
आशा आणि लोभ काय दोन ॥६॥
संत तेचि देव देव तेचि संत ।
म्हणे जनी मात गोष्‍टी भिन्न ॥७॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

पाणी तेंचि मेघ मेघ – संत जनाबाई अभंग – १६९

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *