बाई मी लिहिणें शिकलें - संत जनाबाई अभंग - ११४

संसारीं निधान लाधलें जनां – संत जनाबाई अभंग – १७९

संसारीं निधान लाधलें जनां – संत जनाबाई अभंग – १७९


संसारीं निधान लाधलें जनां ।
सद्‌गुरुचरणा सेवीं बापा ॥१॥
कायावाचामनें तयास देवावीं ।
वस्तु मागून घ्यावी अगोचर ॥२॥
तें गोचर नव्हे जाण गुरुकृपेवीण ।
एर्‍हवी तें आपणा माजी आहे ॥३॥
असतां सम्यक परि जना चुकामुक ।
भुललीं निष्‍टंक मंत्रतंत्रें ॥४॥
माळ वेष्‍टण करीं टापोर घेती शिरीं ।
नेम अष्‍टोत्तरीं करिताती ॥५॥
जो माळ करविता वाचेसि वदविता ।
तया ह्रुदयस्था नेणे कोणी ॥६॥
सोहं आत्मा प्रगट जो दाखवी वाट ।
सद्रुरुवरिष्‍ठ तोचि जाणा ॥७॥
तया उत्तीर्णता व्हावया पदार्था ।
न देखों सर्वथा जनी म्हणे ॥८॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

संसारीं निधान लाधलें जनां – संत जनाबाई अभंग – १७९

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *