बाई मी लिहिणें शिकलें - संत जनाबाई अभंग - ११४

ज्ञानेश्वर अभंग बोलिले – संत जनाबाई अभंग – १९५

ज्ञानेश्वर अभंग बोलिले – संत जनाबाई अभंग – १९५


ज्ञानेश्वर अभंग बोलिले ज्या शब्दां ।
चिदानंद बाबा लिही त्यांस ॥१॥
निवृत्तीचे बोल लिहिले सोपानें ।
मुक्ताईचीं वचनें ज्ञानदेवें ॥२॥
चांगयाचा लिहिणार शामा तो कांसार ।
परमानंद खेचर लिहित होता ॥३॥
सांगे पूर्णानंद लिही परमानंद ।
भगवंत भेटी आनंद रामानंद ॥४॥
सांवत्या माळ्याचा काशिबा गुरव ।
कर्म्याचा वसुदेव काईत होता ॥५॥
चोखामेळ्याचा अनंतभट्‌ट अभ्यंग ।
म्हणोनी नामयाचे जनीचा पांडुरंग ॥६॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

ज्ञानेश्वर अभंग बोलिले – संत जनाबाई अभंग – १९५

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *