बाई मी लिहिणें शिकलें - संत जनाबाई अभंग - ११४

विश्वामित्रें जाऊनि पुढें – संत जनाबाई अभंग – २२८

विश्वामित्रें जाऊनि पुढें – संत जनाबाई अभंग – २२८


विश्वामित्रें जाऊनि पुढें ।
वणवा लाविला चहूंकडे ॥१॥
धूम्रें दाटलें अंबर ।
ज्वाळा येती भयंकर ॥२॥
विश्वामित्रें काय केलें ।
राया बाळातें चुकविलें ॥३॥
दोघे न पडती दृष्‍टि ।
होवोनियां परम कष्‍टी ॥४॥
म्हणे अहा कटकटा ।
काय लिहिलें अदृष्‍टा ॥५॥
मेले वणव्यांत जळोनी ।
ऐसें आलें तिचे मनीं ॥६॥
पिटीललाट करतळें ।
जंग टाकी धरणी लोळे ॥७॥
म्हणे बाळा रोहिदासा ।
भेट देईंगा पाडसा ॥८॥
सूर्यवंशीं चुडारत्‍ना ।
प्राणपति गा निधाना ॥९॥
राव दृष्‍टि न पडतां ।
अग्नि खाईन तत्वतां ॥१०॥
ऐसें विचारिलें मनीं ।
म्हणे नामयाची जनी ॥११॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

विश्वामित्रें जाऊनि पुढें – संत जनाबाई अभंग – २२८

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *