बाई मी लिहिणें शिकलें - संत जनाबाई अभंग - ११४

ऐशापरी पांडवांतें – संत जनाबाई अभंग – ३८

ऐशापरी पांडवांतें – संत जनाबाई अभंग – ३८ऐशापरी पांडवांतें ।
रक्षियेलें दीनानाथें ॥१॥
शंखचक्र आयुधें करीं ।
छाया पितांबर करी ॥२॥
हस्त ठेऊनियां माथां ।
सुखी असा निर्भय चित्तां ॥३॥
आज्ञा घेउनी सर्वांची ।
देव गेले द्वारकेसी ॥४॥
सरला थालिपाक आतां ।
पुढें सावधान श्रोतां ॥५॥
कथा पुढील गहन ।
घोषयात्रा निरुपण ॥६॥
येथुनी अध्याय कळस ।
जनी म्हणे झाला रस ॥७॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

ऐशापरी पांडवांतें – संत जनाबाई अभंग – ३८

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *