sant janardhan swami abhang

मिरवोनि ज्ञान पसरिती ढोंग – संत जनार्दन स्वामी अभंग – ४

मिरवोनि ज्ञान पसरिती ढोंग – संत जनार्दन स्वामी अभंग  -४


मिरवोनि ज्ञान पसरिती ढोंग ।
निंदिती राजयोग मुर्खपणें ॥१॥
तेचि निःसंशय जाणावे अभक्त ।
तारक एचि सत्य राजयोग ॥२॥
गुरुचिया दाप्तां लेखिती सामान्य ।
नेणोनि प्रमाण संतांचे तें ॥३॥
सांगतीं मोळियां सर्वाचि श्रेष्ठ मार्ग ।
संती राजयोग वाळिया हें ॥४॥
तयांपाशी स्थीर नोहावें क्षणैक ।
नाशे अक्षयसुख तयां संगे ॥५॥

सद्भावें रिघावें शरण योगियांसी ।
द्यावा पायांपाशी बळी जीव ॥६॥
नेदी संप्रदाय नेम आचरण ।
नोहावें शरण ऐशां काहीं ॥७॥
ऐसियाचा संग झाल्या क्षण एक ।
त्याहुनी नसे पातक ब्रह्माडींहीं ॥८॥
ढळों नये कोणी केलियांही विघ्न ।
साधावें संपुर्ण याचि देहें ॥९॥
हणें जनार्दन सकळ याचिसाठी ।
उघडी भ्रमताटी एकनाथा ॥१०॥


वरील अभांगाचा अर्थ तुमच्या शब्दामध्ये खाली कमेंट बॉक्समध्ये टाका.

मिरवोनि ज्ञान पसरिती ढोंग – संत जनार्दन स्वामी अभंग  -४

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *