संत जोगा परमानंद अभंग

मन निवाले निवाले – संत जोगा परमानंद अभंग – ३

मन निवाले निवाले – संत जोगा परमानंद अभंग – ३


मन निवाले निवाले ।
कैसें समाधान झालें ॥
संतं आलिया अवसरी ।
नवल आरती यांची परी ॥
आनंदे नर नारी ।
परमानंद प्रकटले ॥
द्यावया आलिंगन ।
बाह्यां येतसे स्फुरण ॥
सजळ झाले लोचन ।
जैसे मेघ वर्षती ॥
आजि सुदिन सोहळा ।
संत जीवनाची कळा ॥
जोगा विनवितो सकळा ।
भेटी परमानंदेस्त ॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

मन निवाले निवाले – संत जोगा परमानंद अभंग – ३

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *