भरंवसा मानिला परी झाली निरास – संत कर्ममेळा
भरंवसा मानिला परी झाली निरास ।
म्हणोनी कासावीस जीवें झालों ॥१॥
बोलिल्या वचना तें कांही साचपण ।
नयेचि दिसोन अद्यापवरी ॥२॥
किती किती मन आवरूनी धरूं ।
कवणासी विचारूं पुसूं आतां ॥३॥
कर्ममेळा म्हणे कर्महीन माझें ।
भोगणें सहजें सहज असे ॥४॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.