संत निवृत्तीनाथ

संत निवृत्तीनाथ माहिती

संत निवृत्तीनाथ हे संत ज्ञानेश्वरांचे मोठे बंधू. नाथ संप्रदायातील गहिनीनाथांनी निवृत्तिनाथांना दीक्षा  दिली.

संत निवृत्तीनाथ जन्म

निवृ​त्तिनाथांचे जन्मवर्ष १२७३ ​किंवा १२६८ असे सां​गितले जाते. ज्ञानेश्वर, सोपानदेव मुक्ताई, निवृत्तिनाथ ह्या चार भावंडांमधे निवृत्तिनाथ हे थोरले होते. निवृ​त्तिनाथ हे ज्ञानेश्वरांचे गुरू होते. निवृत्तिनाथांनी ज्ञानेश्वरांना संस्कृतमध्ये असणारी गीता सामान्य लोकांना समजेल अशा शब्दांत लिहिण्याचा आदेश दिला. त्याप्रमाणे ज्ञानेश्वरांनी भावार्थदीपिका(ज्ञानेश्वरी) लिहून काढली.

गैनीनाथ व ग​हिनीनाथ हे ​निवृत्तिनाथांचे गुरू होते. ‘निवृत्तिचे ध्येय कृष्ण हा​चि होय । ग​यिनीनाथे सोय दाख​विली ॥’, असे निवृत्तिनाथांनीच आपल्या एका अभंगात म्हणून ठे​विले आहे सुमारे तीन-चारशे अभंग आ​णि एक ह​रिपाठ एवढी रचना, ​निश्चितपणे निवृत्तिनाथांची आहे असे म्हणता येईल.. योगपर, अद्वैतपर आ​णि कृष्णभ​क्तिपर असे हे अभंग आहेत. रसवत्तेच्या दृष्टीने ते काहीसे उणे वाटतात; तथा​पि निवृ​त्तिनाथांची ख्याती आ​णि महत्त्व कवी म्हणून नाही, तर ज्ञानेश्वरांचे मार्गदर्शक ‌म्हणून आहे.

ग्रंथ

त्यांनी ‘आपले संपूर्ण अध्यात्मधन ज्ञानेश्वरांना देऊन त्यांना यश ​दिले व आपण त्या यशापासूनही ​निवृत्त झाले’ असे निवृ​त्तिनाथांबद्दल म्हटले जाते. ज्ञानेश्वरांनी त्यांच्याबद्दलचा आदर अनेक ठिकाणी व्यक्त केला आहे. ज्ञानेश्वरांनी संतंमंडळींसह केलेल्या अनेक तीर्थांच्या यात्रेतही निवृत्तिनाथ ‌‌‌त्यांच्या सोबत होतेच. निवृत्तिदेवी, निवृ​त्तिसार आ​णि उत्तरगीताटीका असे तीन ग्रंथही निवृ​त्तिनाथांनी ​लिहिल्याचे म्हटले जाते; तथापि ते अनुपलब्ध आहेत. रा. म. आठवले यांनी निवृत्तेश्वरी असा एक ग्रंथ संबोधिला आहे. ज्ञानेश्वरीप्रमाणेच हेही गीतेवरील एक भाष्य आहे. तथापि हा ग्रंथ निवृत्तिनाथांचाच आहे, असे अद्याप सिद्ध झालेले नाही. धुळ्याच्या श्रीसमर्थवाग्देवतामंदिरात ‘सटीक भगवद्‌गीता’ आणि ‘समाधि बोध’ अशी दोन हस्तलिखिते निवृत्तिनाथांची म्हणून ठेविली आहेत.

ज्ञानेश्वर आणि सोपानदेव समाधिस्थ झाल्यानंतर मुक्ताई ‘अन्नपाणी सकळ’ त्यागूनी परलोकवासी झाली, व पुढे लवकरच निवृत्तिनाथांनीही त्र्यंबकेश्वरी देह ठेविला. त्यांची समाधी तेथेच बांधण्यात आली आहे. निवृत्तिनाथांची पुण्यतिथी ज्येष्ठ शुद्ध द्वादशीला असते.

निवृत्तीनाथांनी ज्ञानदेव, सोपानदेव आणि मुक्ताबाई यांचा माता-पित्याच्या वात्सल्याने सांभाळ केला. निवृत्तिनाथांनीच ज्ञानेश्वरांना संस्कृतमध्ये असणारी गीता सामान्य लोकांना उमजेल अशा शब्दांत लिहिण्याचा आदेश दिला. त्याप्रमाणे ज्ञानेश्वरांनी भावार्थदीपिका(ज्ञानेश्वरी) लिहून काढली.

सुमारे चारशे योगपर, अद्वैतपर आ​णि कृष्णभ​क्तिपर असे अभंग आ​णि एक ह​रिपाठ एवढी रचना निवृत्तिनाथांनी केली आहे. निवृत्तिदेवी, निवृ​त्तिसार आ​णि उत्तरगीताटीका असे तीन ग्रंथही निवृ​त्तिनाथांनी ​लिहिल्याचे म्हटले जाते; तथापि ते अनुपलब्ध आहेत. धुळ्याच्या श्रीसमर्थवाग्देवतामंदिरात ‘सटीक भगवद्‌गीता’ आणि ‘समाधि बोध’ अशी दोन हस्तलिखिते निवृत्तिनाथांची म्हणून ठेवली आहेत.

ज्ञानेश्वर आणि सोपानदेव समाधिस्त झाल्यानंतर मुक्ताई अन्नपाणी त्यागून परलोकवासी झाली .

संत निवृत्तीनाथ जीवन

संत निवृत्तीनाथ हे संत ज्ञानेश्वर यांचे वडीलबंधू आणि गुरु होते. संसारात मन रमेना म्हणून निवृत्तीनाथांचे वडील विठ्ठलपंत एके दिवशी घरातून बाहेर पडले आणि त्यांनी थेट काशीचा मार्ग धरला. त्या ठिकाणी रामानंद नावाचे सदगुरू रहात होते. विठ्ठलपंतांनी त्यांच्याकडून संन्यासदीक्षा घेतली. त्यांच्यापाशी अध्ययन आणि त्यांची सेवा करत ते तेथे राहू लागले.

पुढे गुरूंच्या आज्ञेनुसार विठ्ठलपंत आळंदीस आले आणि त्यांनी परत संसारास प्रारंभ केला. नंतर विठ्ठलपंतांना चार मुले झाली. पहिले निवृत्तीनाथ, दुसरे ज्ञानेश्वर, तिसरे सोपानदेव आणि चौथी मुक्ताबाई. त्यांनी आपल्या मुलांना त्या काळच्या रीतीप्रमाणे सर्व काही शिकवले.

त्यावेळेस विठ्ठलपंत पत्नी आणि मुलांसहित त्र्यंबकेश्वराच्या मागील डोंगरावर गेले. त्या डोंगरावर दाट अरण्य होते. डोंगरात हिंडता-हिंडता एक वाघ धावत आला. त्याला पाहून सर्वांची घाबरगुंडी उडाली. विठ्ठलपंत बायकोमुलांसह पळाले. ते अरण्यातून बाहेर पडले, तेव्हा त्यांचा जीव भांड्यात पडला; पण निवृत्तीनाथ कुठे दिसेनात! पुष्कळ शोध करूनही निवृत्तीनाथ सापडले नाहीत. असे सात दिवस गेले आणि आठव्या दिवशी निवृत्तीनाथ दत्त म्हणून पुढे उभे राहिले. सर्वांना फार आनंद झाला. ते अधिक तेजस्वी दिसत होते. विठ्ठलपंतांनी विचारले,

”अरे इतके दिवस तू कुठे होतास ?” निवृत्तीनाथ म्हणाले, ”बाबा, वाघाला भिऊन पळतांना मी एका गुहेत शिरलो.

त्या ठिकाणी एक स्वामी बसले होते. त्या अंधाऱ्या गुहेतही त्यांची कांती मला स्पष्ट दिसत होती. त्यांचे नाव गहिनीनाथ.

त्यांनी मला योग शिकवला आणि ‘आता जगामध्ये गांजलेले जीव आहेत, त्यांना तू सुखी कर’, असे सांगितले.”

नंतर मुलांची मुंजीची वेळ आली. मुंज करण्यासाठी त्यांना घेऊन विठ्ठलपंत आळंदीला आले;

पण आळंदीच्या निष्ठूर लोकांनी त्यांना सांगितले,

”तुम्ही संन्यासातून परत गृहस्थाश्रम स्वीकारला आहे.

तुम्हाला देहान्त प्रायश्चित्ताविना दुसरे प्रायश्चित्त नाही.

ते तुम्ही घ्याल, तरच मुलांच्या मुंजी होतील.”

हे उत्तर ऐकून विठ्ठलपंत घरी गेले.

मुले गाढ झोपेत आहेत, हे पाहून विठ्ठलपंत आणि रुक्मिणीबाई यांनी आपल्या घरचा निरोप घेतला.

ते थेट प्रयागला गेले आणि त्यांनी गंगेमध्ये जलसमाधी घेतली.

दुसऱ्या दिवशी सकाळी मुले उठल्यानंतर त्यांना आपले आई-वडील घर सोडून गेल्याचे कळले.

त्यांच्या डोक्यावरचे छत्रच नाहीसे झाले.

सर्व भार निवृत्तीनाथांवर पडला होता.

निवृत्तीनाथांनी ज्ञानदेव, सोपानदेव आणि मुक्ताबाई यांचा माता-पित्याच्या वात्सल्याने सांभाळ केला

संत निवृत्तीनाथ समाधी

निवृत्तीनाथ महाराज समाधी

संत निवृत्तीनाथ समाधी मंदिर –

श्री क्षेत्र त्र्यंबकेश्‍वर –

ज्ञानदेव-सोपान –

मुक्ताई या आपल्या भावंडांच्या समाधीनंतर सद्गुरू निवृत्तीनाथ यांनी

शके १२१८ मधील ज्येष्ठ कृ. त्रयोदशी या दिवशी १७ जून १२९७ रोजी त्र्यंबकेश्‍वर येथे संजीवन समाधी घेतली.

समाधीवर इ. स. १८१२ मध्ये दगडी मंदिर उभारण्यात आले.

मूळ मंदिरातील निवृत्तीनाथांची समाधी व मागे विठ्ठल रखुमाईच्या मूर्ती आहेत.

त्र्यंबकेश्‍वर येथील ब्रह्मगिरी पर्वताच्या अगदी पायथ्याशी असलेले सद्गुरू निवृत्तीनाथ महाराज यांचे समाधी मंदिर वारकरी संप्रदायाचे श्रद्धास्थान आहे.


शेतमालाची मोफत जाहिरात करण्यासाठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या

source :- wikipedia

sant nivruttinath in marathi, sant nivruttinath images, sant nivruttinath maharaj, sant nivruttinath maharaj samadhi, sant nivruttinath maharaj information in marathi

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *