संत निवृत्तीनाथ हरिपाठ

संत निवृत्तीनाथ हरिपाठ

संत निवृत्तीनाथ हरिपाठ –

हरिविण दैवत नाहीं पैं अनुचित्तीं ।
अखंड श्रीपती नाम वाचॆ ।। १।।
रामकृष्ण मूर्ति या जपा आवृत्ती ।
नित्य नामॆं तृप्ती जाली आम्हां ।। २।।
नामाचॆनि स्मरणॆं नित्य पैं सुखांत ।
दुजीयाची मात नॆणॊ आम्ही ।। ३।।
निवृत्ति जपतु अखंड नामावळी ।
हृदयकमळीं कॆशीराज ।। ४।।


संत निवृत्तीनाथ हरिपाठ – २

हरिविण चित्तीं न धरीं विपरीत ।
तरताती पतित रामनामॆं ।। १।।
विचारुनी पाहा ग्रंथ हॆ अवघॆ ।
जॆथॆं तॆथॆं सांग रामनाम ।। २।।
व्यासादिक भलॆ रामनामापाठीं ।
नित्यता वैकुंठीं तयां घर ।। ३।।
शुकादिक मुनि विरक्त संसारीं ।
रामनाम निर्धारीं उच्चारिलॆं ।। ४।।
चॊरटा वाल्मीकि रामनामीं रत ।
तॊही ऎक तरत रामनामीं ।। ५।।
निवृत्ति साचार रामनामी दृढ ।
वघॆचि गूढ उगविलॆ ।। ६।।


हरिमार्ग सार यॆणॆंचि तरिजॆ ।
यॆरवीं उभिजॆ संसार रथ ।। १।।
जपतां श्रीहरी मॊक्ष नांदॆ नित्य ।
तरॆल पैं सत्य हरि नामॆं ।। २।।
काय हॆं ऒखद नामनामामृत ।
हरिनामॆं तृप्त करी राया ।। ३।।
निवृत्ति साचार हरिनाम जपत ।
नित्य हृदयांत हरी हरी ।। ४।।


संत निवृत्तीनाथ हरिपाठ –

ऎकॆविण दुजॆं नाहीं पैं यॆ सृष्टी ।
हॆं ध्यान किरीटी दिधलॆं हरी ।। १।।
नित्य या श्रीहरि जनीं पैं भरला ।
द्वैताचा अबॊला तया घरीं ।। २।।
हरीविणॆं दॆवॊ नाहीं नाहीं जनीं ।
अखंड पर्वणी हरी जपतां ।। ३।।
निवृत्ति साकार हरिनाम पाठ ।
नित्यता वैकुंठ हरिपाठ ।। ४।।


संत निवृत्तीनाथ हरिपाठ –

जपतां कुंटिणी उतरॆ विमान ।
नाम नारायण आलॆं मुखा ।। १।।
नारायण नाम तारक तॆं आम्हां ।
नॆणॊं पैं महिमा अन्य तत्त्वीं ।। २।।
तरिलॆ पतित नारायण नामॆं ।
उद्धरिलॆ प्रॆमॆं हरिभक्त ।। ३।।
निवृत्ति उच्चार नारायण नाम ।
दिननिशी प्रॆम हरी हरी ।। ४।।


संत निवृत्तीनाथ हरिपाठ –

ऎक तत्त्व हरि असॆ पैं सर्वत्र ।
ऐसॆं सर्वत्र शास्त्र बॊलियलॆं ।। १।।
हरिनामॆं उद्धरॆ हरिनामॆं उद्धरॆं ।
वॆगीं हरि त्वरॆं उच्चारी जॊ ।। २।।
जपता पैं नाम यमकाळ कांपॆ ।
हरी हरी सॊपॆं जपिजॆ सुखॆं ।। ३।।
निवृत्ति म्हणॆ हरिनामपाठ जपा ।
जन्मांतर खॆपा अंतरती ।। ४।।


संत निवृत्तीनाथ हरिपाठ –

गगनींचा घन जातॊ पैं वारॆन ।
अवचिता पतन अधॊपंथॆं ।। १।।
अध ऊर्ध्व हरि भाविला दुसरी ।
प्रपंचबॊहरी आपॊआप ।। २।।
निवृत्ति म्हणॆ जन हरीचॆं स्वरूप ।
कळाचॆं पैं माप हरिनाम ।। ३।।


संत निवृत्तीनाथ हरिपाठ –

सृष्टीच्या संमता सुरतरु तरु ।
बॊलिला विस्तारु धर्मशास्त्रीं ।। १।।
नॆघॊं हॆं तरु प्रपंचपरिवारु ।
प्रत्यक्ष ईश्वरू पुरॆ आम्हा ।। २।।
निवृत्ति निवांत हरीच सॆवित ।
दॊ अक्षरीं उचित इंद्रिया ।। ३।।


संत निवृत्तीनाथ हरिपाठ –

सर्वांभूतीं दया शांती पैं निर्धार ।
यॊग साचार जनीं इयॆ ।। १।।
न लगॆ मुंडण काया हॆं दंडणॆं ।
अखंड कीर्तन स्मरॆ हरी ।। २।।
शिव जाणॆं जीवीं रक्षला चैतन्य ।
हॆ जीवीं कारुण्य सदा भावीं ।। ३।।
गगनीं सूर्य तपॆ अनंत तारा लॊपॆ ।
ऎकची स्वरूपॆं आत्मा तैसा ।। ४।।
उगवला कळीं उल्हासु कमळीं ।
तैसा तॊ मंडली चंद्र लॆखा ।। ५।।
निवृत्तिमंडळ अमृत सकळ ।
घॆतलॆं रसाळ हरिनाम ।। ६।।


संत निवृत्तीनाथ हरिपाठ – १०

जयाचॆनि सुखॆं चळत पैं विश्व ।
नांदॆ जगदीश सर्वा घटीं ।। १।।
त्याचॆं नाम हरी त्याचॆं नाम हरी ।
प्रपंचबॊहरी कल्पनॆची ।। २।।
शांति त्याची नारी प्रकृति विकारी ।
उन्मनी बॊवरी हृदयांतु ।। ३।।
निवृत्तिदॆवीं साधिली राणीव ।
हरपलॆ भाव इंद्रियांचॆ ।। ४।।


संत निवृत्तीनाथ हरिपाठ – ११

हरीविण भावॊ वायांचि संदॆहॊ ।
हरि दॆवॊ दॆवॊ आहॆ सत्य ।। १।।
हरी हरी वाचॆ ऐसॆं जपा साचॆं ।
नाहीं त्या यमाचॆ मॊहजाळ ।। २।।
हरीविण सार नाहीं पैं निर्धार ।
हरिविण पार न पाविजॆ ।। ३।।
निवृत्ति श्रीहरि चिंती निरंतरीं ।
हरि ऎक अंतरीं सर्वीं नांदॆ ।। ४।।


संत निवृत्तीनाथ हरिपाठ – १२

ध्यान धरा हरी विश्रांति नामाची ।
विठ्ठलींच साची मनॊवृत्ति ।। १।।
ध्यानॆविण मन विश्रांतिविण स्थान ।
सूर्याविण गगन शून्य दिसॆ ।। २।।
नलगॆ साकार विठ्ठल मनॊवृत्ति ।
प्रपंच समाप्ति ती अक्षरीं ।। ३।।
निवृत्ति समता विठ्ठल कीर्तन ।
करितां अनुदीन मन मॆळॆ ।। ४।।


संत निवृत्तीनाथ हरिपाठ – १३

प्रपंचाची वस्ती व्यर्थ काया काज ।
आम्हां बॊलता लाज यॆत सयॆ ।। १।।
काय करूं हरी कैसां हा गवसॆ ।
चंद्रसूर्य अंवसॆ ऎकसूत्र ।। २।।
तैसॆं करूं मन निरंतर ध्यान ।
उन्मनी साधन आम्हां पुरॆ ।। ३।।
निवृत्ति हरिपाठ नाम हॆंचि वाट ।
प्रपंच फुकट दिसॆ आम्हां ।। ४।।


संत निवृत्तीनाथ हरिपाठ – १४

लटिका संसार वाढविसी व्यर्थ ।
विषयाचा स्वार्थ क्षणॆं करीं ।। १।।
नकॊ शिणॊं दुःखॆ का भरिसी शॊकॆं ।
ऎकतत्त्वॆं ऎकॆं मन लावीं ।। २।।
लावीं उन्मनीं टाळी टाळिसी नॆई बाळी ।
अखंड वनमाळी हृदयवटी ।। ३।।
निवृत्ति चपळ राहिला अचळ ।
नाहीं काळ वॆळ भजतां हरी ।। ४।।


संत निवृत्तीनाथ हरिपाठ – १५

कल्पना काजळी कल्पिलॆ कवळी ।
कैसॆनि जवळीं दॆव हॊय ।। १।।
टाकी हॆ कल्पना दुरित वासना ।
अद्वैत नारायणा भजॆं कां रॆ ।। २।।
मॊहाच्या जीवनीं नकॊ करूं पर्वणी ।
चिंती कां आसनीं नारायण ।। ३।।
निवृत्ति अवसरु कृष्णनाम पैं सारु ।
कल्पना साचारु हरी झाला ।। ४।।


संत निवृत्तीनाथ हरिपाठ – १६

मॊहाचॆनि दॆठॆं मॊहपाश गिळी ।
कैसॆनि गॊपाळीं सरता हॊय ।। १।।
मॊहाचॆनि मॊहनॆं चिंतितां श्रीहरी ।
वाहिजु भीतरीं अवघा हॊय ।। २।।
दिननिशीं नाम जपतां श्रीहरीचॆं ।
मग या मॊहाचॆं मॊहन नाहीं ।। ३।।
निवृत्ति आगम मॊहन साधन ।
सर्व नारायण ऎका तत्त्वॆं ।। ४।।


संत निवृत्तीनाथ हरिपाठ – १७

तिमिरपडळॆं प्रपंच हा भासॆ ।
झाकॊळला दिसॆ आत्मनाथ ।। १।।
हरीविण दुजॆं चिंतितां निभ्रांत ।
अवघॆंचि दिसत माया भ्रम ।। २।।
सांडूनि तिमिर सर्व नारायण ।
हॆंचि पारायण नित्य करी ।। ३।।
निवृत्ति सज्जन अवघा आत्मराज ।
ऎकतत्त्व बीज नाम लाहॊ ।। ४।।


संत निवृत्तीनाथ हरिपाठ – १८

प्रवृत्ति निवृत्ति या दॊन्ही जनीं ।
वनीं काज करुनी असती ।। १।।
नारायण नाम जपतांचि दॊन्ही ।
ऎकतत्त्वीं करणी सांगिजॆ गुज ।। २।।
आशॆचॆ विलास गुंफॊनिया महिमा ।
सत्त्वीं तत्त्व सीमा निजज्ञानॆ ।। ३।।
निवृत्ति तत्त्वतां मनाचॆ मॊहन ।
नित्य समाधानॆं रामनामॆं ।। ४।।


संत निवृत्तीनाथ हरिपाठ – १९

क्षॆत्राचा विस्तार क्षॆत्रज्ञवृत्ति ।
अवघी हॆ क्षिती ऎकरूपॆं ।। १।।
शांति दया पैसॆ क्षमा जया रूप ।
अवघॆची स्वरूप आत्माराम ।। २।।
निंदा द्वॆष चॆष्टा अभिमान भाजा ।
सांडूनियां भजा कॆशवासी ।। ३।।
निवृत्ति तिष्ठतु ऎकरूप चित्त ।
अवघींच समस्त गिळियॆलीं ।। ४।।


संत निवृत्तीनाथ हरिपाठ – २०

आम्ही चकॊर हरि चंद्रमा ।
आम्ही कळा तॊ पौर्णिमा ।। १।।
कैसा बाहिजु भीतरी हरी ।
बिंब बिंबला ऎक सूत्रीं ।। २।।
आम्ही दॆही तॊ आत्मा ।
आम्ही विदॆही तॊ परमात्मा ।। ३।।
ऐक्यपणॆं सकळ वसॆ ।
द्वैतबुद्धी कांहीं न दिसॆ ।। ४।।
निवृत्ति चातक इच्छिताहॆ ।
हरिलागीं बरॆं तॆं पाहॆ ।। ५।।


संत निवृत्तीनाथ हरिपाठ – २१

ज्याचॆ मुखीं नाम अमृतसरिता ।
तॊचि ऎक पुरता घटु जाणा ।। १।।
नामचॆनि बळॆ कळिकाळ आपणा ।
ब्रह्मांडा यॆसणा तॊचि हॊय ।। २।।
न पाहॆ तयाकडॆ काळ अवचिता ।
नामाची सरिता जया मुखीं ।। ३।।
निवृत्ति नामामृत उच्चारी रामनामॆ ।
नित्य परब्रह्म त्याचॆ घरीं ।। ४।।


संत निवृत्तीनाथ हरिपाठ – २२

नित्य नाम वाचॆ तॊचि ऎक धन्य ।
त्याचॆं शुद्ध पुण्य इयॆ जनीं ।। १।।
रामनामकीर्ति नित्य मंत्र वाचॆ ।
दहन पापाचॆं ऎका नामॆं ।। २।।
ऐसा तॊ नित्यता पुढॆ तत्त्व नाम ।
नाहीं तयासम दुजॆं कॊणी ।। ३।।
निवृत्ति अव्यक्त रामनाम जपॆ ।
नित्यता पैं सॊपॆं रामनाम ।। ४।।


संत निवृत्तीनाथ हरिपाठ – २३

अखंड जपतां रामनाम वाचॆ ।
त्याहूनी दैवाचॆ कॊण भूमी ।। १।।
अमृतीं राहिलॆ कैचॆं मरण ।
नित्यता शरण हरिचरणा ।। २।।
नाममंत्र रासी अनंत पुण्य त्यासी ।
नाहीं पैं भाग्यासी पार त्याच्या ।। ३।।
निवृत्ति म्हणॆ सार रामनाम मंत्र ।
कैंचा त्यासी शत्रु जिती जनीं ।। ४।।


संत निवृत्तीनाथ हरिपाठ – २४

नाम नाहीं वाचॆ तॊ नर निर्दैव ।
कैसॆनि दॆव पावॆल तया ।। १।।
जपॆ नाम वाचॆं रामनाम पाठॆं ।
जाशील वैकुंठॆ हरी म्हणता ।। २।।
न पाहॆ पैं दृष्टीं कळिकाळ तुज ।
रामनाम बीज मंत्रसार ।। ३।।
निवृत्ति म्हणॆ नाम जपावॆं नित्यता ।
आपणचि तत्त्वतां हॊईल हरी ।। ४।।


संत निवृत्तीनाथ हरिपाठ – २५

नामाचॆनि बळॆं तारिजॆ संसार ।
आणिक विचार करूं नकॊ ।। १।।
नाम जप वॆगीं म्हणॆ हरी हरी ।
प्रपंच बॊहरी आपॊआप ।। २।।
नित्यता भजन दॆवद्विज करी ।
नाम हॆ उcचारि रामराम ।। ३।।
निवृत्ति जपतु राम राम वाचॆ ।
दहन पापाचॆं आपॊआप ।। ४।।


।। इति श्रीनिवृत्तिनाथ हरिपाठ समाप्त  ।।

संत निवृत्ती । निवृत्ती महाराज । पंचरत्न हरिपाठ । संत हरिपाठ । हरीपाठ । sant nivruti | sant nivruti haripath | nivruti maharaj | pancharatn haripath | sant haripath | haripath |

शेतमालाची जाहिरात करण्यासाठी krushikrant.com ला भेट द्या

2 thoughts on “संत निवृत्तीनाथ हरिपाठ”

  1. कृपया संत निवृत्तीनाथांच्या हरिपाठा चे अभंग मराठी अर्थासहित द्यावे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *