अनंत जन्म घेतले याच देही – संत माणकोजी बोधले अभंग
अनंत जन्म घेतले याच देही ।
माझे स्वहित नव्हे कोठे काही ॥१॥
वेगी पावे पावे कृपानिधी ।
भवकर्म छेदी बा माझी आता ॥ २ ॥
संसारकर्मे बहुत भुललो ।
तुझे भजनी सावध नाही जालो ॥३॥
माया संसाराचा करिता भरोभरी ।
तुझा आठव नाही क्षणभरी ॥४॥
बोधला म्हणे तुज विनवितो देवा ।
काही घडो दे देही संतसेवा ॥५॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.