चरणी घागऱ्या घुळ घुळर – संत माणकोजी बोधले अभंग
चरणी घागऱ्या घुळ घुळर ।
त्यापरि वाकि वाजति मंजुळ रे ॥१॥
कैश्या गोपिका शोभति दोहि भागि रे ।
आपण कृष्ण खेळता कैसा रंगि रे ॥ २॥
कैसा गोपाळास देतो शोभा रे।
बोधला म्हणे हा उभा भीमातिरी ।
कैसा सवंगड्या वाटितो सिदोरी रे ॥४॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.