घ्यावो सुखाचे फुकाचे – संत माणकोजी बोधले अभंग
घ्यावो सुखाचे फुकाचे ।
नाम माझ्या विठोबाचे ॥१॥
घेता बहुत आहे सोपे ।
भरा आपुलाली मापे ॥ २॥
येथे दुजा नाही कोणी ।
घेता बहुत आहे धनी ॥३॥
न लगे हे जकाती ।
छाया आपुलाले हाती ॥४॥
बोधला म्हणे वर्णन केली ।
जनी ठेवी धरा आली ॥५॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.