संत माणकोजी बोधले अभंग

संसारासाठी निघाली हा हा – संत माणकोजी बोधले अभंग

संसारासाठी निघाली हा हा – संत माणकोजी बोधले अभंग


संसारासाठी निघाली हा हा ।
तमाशा पाहिला मोठा रे ॥ १॥
होता संचिताचा विक्रा केला ।
सर्वही आटला पोटा रे ॥ २ ॥
असत्याचे माप टाकुनी देई ।
सांडी हरी विक्राई खोटी रे ॥३॥
सत्याची तागडी धरून हाती ।
बसी मुक्ती चौहाटा हे ॥४॥
नामाचे केणे भरी तोचि भला ।
अभागी चुकला करंटा रे ॥५॥
विठोबा पाहुणा जोड झाली बरी ।
मोकळ्या चारी वाटा रे ॥६॥
बोधला म्हणे आम्हा थोर लाभ झाला ।
हाकारिल्या चारी पेठा रे ॥७॥राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

संसारासाठी निघाली हा हा – संत माणकोजी बोधले अभंग

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *