sant muktabai gatha

एक आपण साधू झाले – संत मुक्ताबाई अभंग

एक आपण साधू झाले – संत मुक्ताबाई अभंग


एक आपण साधू झाले।
येर कोण वाया गेले ? ॥१॥
उठे विकार ब्रह्मी मूळ।
अवघे मायेचें गबाळ ॥२॥
माय समूळ नुरे जेव्हां।
विश्व ब्रह्म होइल तेव्हां ॥३॥
ऐसा उमज आदिअंतीं।
मग सुखी व्हावे संती ॥४॥
चिंता क्रोध मागे सारा ।
ताटी उघडा ज्ञानेश्वरा ॥५॥


माऊली आपणास या अभंगाचा अर्थ  माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

संत मुक्ताबाई अँप डाउनलोड करा.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *