sant muktabai gatha

संत तेचि जाणा जगीं – संत मुक्ताबाई अभंग

संत तेचि जाणा जगीं – संत मुक्ताबाई अभंग


संत तेचि जाणा जगीं।
दया क्षमा ज्यांचे अंगी ॥१॥
लोभ अहंता न ये मना।
जगी विरक्त तोची जाणा ॥२॥
इह परलोकीं सुखी।
शुद्ध ज्ञान ज्यांचे मुखीं ॥३॥
मिथ्या कल्पना मागें सारा ।
ताटी उघडा ज्ञानेश्वरा ॥४॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

संत मुक्ताबाई अँप डाउनलोड करा.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *