संत नरहरी सोनार अभंग

देवा तुझा मी सोनार – संत नरहरी सोनार अभंग

देवा तुझा मी सोनार – संत नरहरी सोनार अभंग


देवा तुझा मी सोनार ।
तुझे नामाचा व्यवहार ॥ १ ॥
देह बागेसरी जाणे ।
अंतरात्मा नाम सोनें ॥ २ ॥
त्रिगुणाची करुनी मूस ।
आंत ओतिला ब्रह्मरस ॥ ३ ॥
जीव शिव करुनी फुंकी ।
रात्रंदिवस ठोकाठोकी ॥ ४ ॥
विवेक हातवडा घेऊन ।
कामक्रोध केला चूर्ण ॥ ५ ॥
मनबुद्धीची कातरी ।
रामनाम सोनें चोरी ॥ ६ ॥
ज्ञान ताजवा घेउन हातीं ।
दोन्ही अक्षरें जोखिती ॥ ७ ॥
खांद्या वाहोनी पोतडी ।
उतरला पैलथडी ॥ ८ ॥
नरहरी सोनार हरीचा दास ।
भजन करी रात्रंदिवस ॥ ९ ॥


वरील अभांगाचा अर्थ तुमच्या शब्दामध्ये खाली कमेंट बॉक्समध्ये टाका.
संत नरहरी सोनार अँप डाउनलोड करा.
play store

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *