संत नरहरी सोनार अभंग

धन्य पुंडलिक भक्त निवडला – संत नरहरी सोनार अभंग

धन्य पुंडलिक भक्त निवडला – संत नरहरी सोनार अभंग


धन्य पुंडलिक भक्त निवडला ।
अक्षयीं राहिला चंद्रभागीं ॥ १ ॥
भक्त नामदेव अक्षयीं जडला ।
पायरी तो झाला महाद्वारीं ॥ २ ॥
ज्ञानोबा सोपान निघती हे भक्त ।
अक्षयीं राहत परब्रह्मीं ॥ ३ ॥
बोधरज भला वचनीं गोविला ।
कीर्तनीं राहिला पांडुरंग ॥ ४ ॥
साधुसंत फार येती थोर थोर ।
उभा निरंतर चोखामेळा ॥ ५ ॥
संत साधुजन वंदिती चरण ।
नरहरी निशिदिन सेवेलागी ॥ ६ ॥


वरील अभांगाचा अर्थ तुमच्या शब्दामध्ये खाली कमेंट बॉक्समध्ये टाका.
संत नरहरी सोनार अँप डाउनलोड करा.
play store

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *