संत नरहरी सोनार अभंग

कृपाळु समर्था सद्‍गुरु अनंता – संत नरहरी सोनार अभंग

कृपाळु समर्था सद्‍गुरु अनंता – संत नरहरी सोनार अभंग


कृपाळु समर्था सद्‍गुरु अनंता ।
गुरु कृपावंता दया करीं ॥ १ ॥
अनाथ अपराधी तारी हा भवाब्धी ।
मृगजळ नदी तारी देखा ॥ २ ॥
दीनाचा दयाळु भक्तांचा कनवाळु ।
करितां सांभाळु हरिभक्ताचा ॥ ३ ॥
हरिनाम उच्चारी देव कृपा करी ।
भक्तांचा कैवारी पांडुरंग ॥ ४ ॥
कृपाळु भगवंते पुरविला हेत ।
मुखीं नामामृत नरहरी ॥ ५ ॥


वरील अभांगाचा अर्थ तुमच्या शब्दामध्ये खाली कमेंट बॉक्समध्ये टाका.
संत नरहरी सोनार अँप डाउनलोड करा.
play store

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *