पापांचे पर्वत मोठे झाले – संत नरहरी सोनार अभंग
पापांचे पर्वत मोठे झाले ।
शरीर नासलें अधोगती ॥ १ ॥
जन्मांतरीं केलें अवघें व्यर्थ गेलें ।
देह हो नासले क्षणामाजी ॥ २ ॥
जिणें आशाश्वत देह नाशिवंत ।
अवघें सारें व्यर्थ असे देखा ॥ ३ ॥
कांहीं नाहीं दान कांहीं नाहीं पुण्य ।
जन्मासी येऊन व्यर्थ जाय ॥ ४ ॥
परोपकार कांहीं नाहीं केला देवा ।
सद्गुरु केशवा ह्रदयीं ध्यावा ॥ ५ ॥
सारामध्यें सार नाम असे थोर ।
ह्रदयीं निरंतर नरहरीच्या ॥ ६ ॥
वरील अभांगाचा अर्थ तुमच्या शब्दामध्ये खाली कमेंट बॉक्समध्ये टाका.
संत नरहरी सोनार अँप डाउनलोड करा.