संत निळोबाराय अभंग

एक गांऊ आम्ही – संत निळोबाराय अभंग – १००६

एक गांऊ आम्ही – संत निळोबाराय अभंग – १००६


एक गांऊ आम्ही विठोबाचें नाम ।
सकळहि धाम मंगळाचें ॥१॥
इतर साधनें फळ काम देती ।
पुनरपी आणिती गर्भवसा ॥२॥
योग याग स्वर्ग काम फळदाते ।
म्हणोनियां त्यातें दूषिती संत ॥३॥
निळा म्हणे नाहीं विकार हरिनामा ।
पाववी निजधामा स्वस्ति क्षेम ॥४॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

एक गांऊ आम्ही – संत निळोबाराय अभंग – १००६

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *