संत निळोबाराय अभंग

धराल तरी धराल चित्तीं – संत निळोबाराय अभंग – १०२३

धराल तरी धराल चित्तीं – संत निळोबाराय अभंग – १०२३

धराल तरी धराल चित्तीं ।
संशय निवुत्ती करुनियां ॥१॥
या हो विठोबाच्या नामें ।
साधनें दुर्गमें लाजविलीं ॥२॥
सहजचि उच्चार करितां वाचे ।
सायुज्याचे अधिकारी ॥३॥
अनन्यभावें शरणागत ।
होतां पतित उध्दरिले ॥४॥
न मागोनियां धन संपत्ती ।
भाव भक्तिी भुकेला ॥५॥
निळा म्हणे अंतर जाणे ।
अधम न म्हणे उत्त्म हा ॥६॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

धराल तरी धराल चित्तीं – संत निळोबाराय अभंग – १०२३

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *