संत निळोबाराय अभंग

सुखें करावें भोजन – संत निळोबाराय अभंग – १०६४

सुखें करावें भोजन – संत निळोबाराय अभंग – १०६४

सुखें करावें भोजन
गर्जावे गुण श्रीहरिचे ॥१॥
ल्यावें लेणें अळंकार
असावें सादर हरिकथे ॥२॥
यथाविधी भोगितां भोग
ह्रदयीं पांडुरंग आठवावा ॥३॥
निळा म्हणे न लिंपे कर्मा
हरिनाम धर्मा अवलंबितां ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

सुखें करावें भोजन – संत निळोबाराय अभंग – १०६४

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *